Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Crop Damage : परतीच्या पावसामुळे सोयाबीन पुन्हा पाण्याखाली

Heavy Rain Crop Loss : बहरात असलेले सोयाबीनचे पीक काढणीला येताच परतीच्या पावसाने दोन्ही जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून हाता तोंडाशी आलेले पीक पुन्हा पाण्याखाली गेले आहे.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : बहरात असलेले सोयाबीनचे पीक काढणीला येताच परतीच्या पावसाने दोन्ही जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून हाता तोंडाशी आलेले पीक पुन्हा पाण्याखाली गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून आणखी पावसाची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. दुसरीकडे मजुरांकडून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू झाली असून पावसाच्या भीतीने शेतकरी मोठी मजुरी देऊन सोयाबीनची काढणी करताना दिसत आहेत.

गेल्या दोन दिवसापासून दोन्ही जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस पडल्याने सोयाबीन व खरिपातील पिके जोमदार आहेत. गेल्यावर्षी परतीच्या पावसाने हुलकावणी दिली होती. यामुळे यंदाही सोयाबीनची काढणी झाल्यानंतर परतीचा पाऊस येईल, असे चित्र असतानाच पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरवात केली आहे.

पावसाच्या अगोदर सोयाबीनच्या काढणीला शेतकऱ्यांनी वेग दिला आहे. यामुळे सध्या शिवारांमध्ये लगबग सुरू असून पावसाने नुकसान होण्याआधी पिकांच्या काढणीसाठी शेतकरी धावपळ करत आहेत. याचा फायदा मजुरांकडून उठवला जात असून मजुरांच्या टोळक्यांनी मजुरीचे भाव वाढवून शेतकऱ्यांची अडवणूक सुरू केली आहे.

उंच वाढलेले सोयाबीन काढणीसाठी मजुरांशिवाय पर्याय नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने काही भागात सोयाबीनचे पीक पुन्हा पाण्याखाली गेले आहे.

काही भागात काढणी करून शेतात ठेवलेले सोयाबीन गोळा करण्याआधीच पावसाच्या तावडीत सापडल्याने नुकसान झाले आहे. २१ दिवसापूर्वी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन पिके पाण्याखाली गेली होती. त्याचा परिणाम पिकांच्या उत्पन्नावर झाला. यातच परतीच्या पावसामुळे पिके जाग्यावर उद्ध्वस्त झाली आहेत.

दोन दिवसापासून होत असलेल्या पावसामुळे काढणीला आलेले सोयाबीन खराब झाले असून शेंगातील दाणे काळे पडत आहेत. येत्या काळात असाच पाऊस राहिला तर शेतकऱ्यांच्या हाती काहीच येणार नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी.
- प्रदीप ढगे, शेतकरी, चिंचपूर, ता. भूम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT