Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Procurement Center : सव्वा लाख हेक्टरवर सोयाबीन, तर खरेदी केंद्रे दोनच

Soybean Update : हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही पणन विभागाने हमीभावाने खरेदीसाठी केवळ दोनच खरेदी केंद्रे सुरू केली आहेत.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात एक लाख ३८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाची पेरणी झाली आहे. मात्र, हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही पणन विभागाने हमीभावाने खरेदीसाठी केवळ दोनच खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. तर फक्त ८९ शेतकऱ्यांकडून एक हजार २३० क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

सरकारने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल चार हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना आठ केंद्रांना मंजुरी दिली असून, त्यापैकी बार्शी व मानेगाव या दोन ठिकाणी पणन विभागाने हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ३८ हजार ५३३ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली असताना विलंबाने आणि कमी ठिकाणी हमीभाव केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांची बोळवण केली गेली आहे.

मॉईश्चर (ओलावा) मुळे अद्याप सोयाबीनची आवक नसल्याने अन्य ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू केले नसल्याचे कारण प्रशासनाकडून पुढे केले जात आहे. सध्या सोलापूरच्या बाजार समितीतच दररोज सुमारे एक हजार पोती सोयाबीनची आवक आहे. दोन दिवसांपूर्वी प्रतिक्विंटल चार हजार २०० ते ३०० रुपये असलेला दर शुक्रवारी (ता. २५) साडेचार हजारांवर पोचला तरी शेतकऱ्यांना ४०० रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे.

सोलापूर, अक्कलकोटला खरेदी केंद्राची गरज

जिल्ह्यात उत्तर सोलापूर १७५२४, दक्षिण सोलापूर ७८९९, अक्कलकोट १३६१७ हेक्टर तर बार्शीत सर्वाधिक ८८९८५ हेक्टरवर सायोबीनची पेरणी झाली आहे. बार्शी तालुक्यात दोन केंद्रे सुरू झाली आहेत. मात्र, सोलापूर व अक्कलकोटला अद्याप खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. या दोन्ही ठिकाणी तातडीने खरेदी केंद्र सुरू होण्याची गरज आहे.

फक्त ७४७ शेतकऱ्यांची नोंदणी

जिल्ह्यातील बार्शी ४५८, मानेगाव २२२, अक्कलकोट ६४, पंढरपूर ३ शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली आहे. तर ८९ शेतकऱ्यांकडून एक हजार २३० क्विंटल सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यात आली आहे. यावरून हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही केवळ एक टन मालाची खरेदी झाली आहे.

ओलाव्यामुळे अद्याप शेतकरी सोयाबीन विक्रीस येताना दिसत नाही. सध्या बार्शी, मानेगावात केंद्र सुरू असून सोयाबीन खरेदीनंतर चार ते आठ दिवसांत बिल दिले जात आहे. कुर्डुवाडी, पंढरपूर, माळकवठे, करमाळा, मंगळवेढा येथून हमीभाव खरेदी केंद्राची मागणी नाही. लवकरच सोलापूर, अकलूज व वैराग येथे खरेदी केंद्र सुरू केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करावी.
हरिदास भोसले, पणन अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT