Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : शेतात तळे साचल्याने सोयाबीनला फटका

Soybean Crop : परिसरात झालेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यांमध्ये सद्यःस्थितीत सोयाबीनची काढणी सुरू आहे.

Team Agrowon

Jalna News : परिसरात झालेल्या दोन दिवसांच्या जोरदार पावसाने सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जाफराबाद तालुक्यांमध्ये सद्यःस्थितीत सोयाबीनची काढणी सुरू आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने शेतामध्ये ठिकठिकाणी तळ्याचे स्वरूप आले आहे. यामुळे नुकतीच सोंगणी केलेली सोयाबीनची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.

काही शेतकऱ्यांनी लगबगीने महागडे कापडे घेऊन सोयाबीनची गंजी झाकून टाकली परंतु बहुतांश शेतकऱ्यांना पाण्यात सोयाबीन भिजताना पाहावी लागत आहे. टेंभुर्णी, अकोला देव, पापळ, नांदखेडा, कुंभारझरी, खासगाव, चिंचखेडा, बोरगाव या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान केले. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

जाफराबाद तालुक्यातील ६५ हजार हेक्टर क्षेत्रपैकी सर्वाधिक लागवड सोयाबीनची करण्यात आलेली आहे. मागील आठवड्यात पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान, काढणीस आलेले पीक पुन्हा पावसाने झोडपले असल्याने सोंगणी केलेल्या पिकाचे नुकसान झाले. शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी दाखल केल्या आहेत. या संदर्भात पीक विमा कंपन्यांनी पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

 मदतीसाठी पुढाकार  घेण्याची गरज

सद्यःस्थितीत विविध विषयावर राजकारण्यांकडून आवाज उठवला जात असताना शेती पिकाकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे सोयाबीन पिकाच्या नुकसानी संदर्भात सर्वच राजकीय पक्षांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भावना शेतकऱ्यातून व्यक्त होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Relief : पिण्याचे पाणी, पीक नुकसान, चारा व्यवस्थापनावर भर

Gaushala Empowerment : गो-१० संकल्पा’तून गोशाळांना आर्थिक स्वावलंबनाचे बळ

Seed Planning : रब्बी हंगामासाठी ७,७८४ क्विंटल बियाण्यांचे नियोजन

Sugarcane Price : ‘नॅचरल’कडून उसाला पहिली उचल ३,३०० रुपये

Sangli Development : सांगली जिल्ह्यात २८ हजार कामांना मान्यता

SCROLL FOR NEXT