Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : सातारा जिल्ह्यात रब्‍बी पिकांच्या पेरणीस वेग

Rabi Sowing : ज्वारी, मका पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आला असून हरभरा गहू पिकांच्या पेरणीस वेगात सुरू आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात थंडी वाढल्याने रब्बी पेरणीच्या कामांना वेग आला आहे. आतापर्यंत ७३.७९ टक्के पेरणीची कामे उरकली आहेत. ज्वारी, मका पिकांची पेरणी अंतिम टप्प्यात आला असून हरभरा गहू पिकांच्या पेरणीस वेगात सुरू आहे.

जिल्ह्यात यंदा पावसाचा मुक्काम वाढल्याने पेरणीची कामे सुरू होण्यास उशीर झाला होता. सध्या पेरणीची कामे गतीने सुरू आहेत. रब्बी ज्वारी मका पिकांची पेरणीची कामे उरकत आली आहे. पावसाच्या ओलीवर ज्वारी पेरा केला असल्याने उगवण चांगली होत आहे.

सध्या थंडी सुरू झाली असल्याने हरभरा, गहू पिकांच्या पेरण्यास वेग आला आहे. काही ठिकाणी आंतरपीक म्हणून गहू, हरभरा केला जात आहे. जिल्ह्याच्या पूर्व भागात कांदा लागवड सुरू झाली आहे.

तर पश्चिम भागात रोपे तयार करण्याच्या कामात शेतकरी व्यस्त आहेत. माण, खटाव, फलटण, खंडाळा, कोरेगाव या दुष्काळी तालुक्यांचा रब्बी हंगाम प्रमुख असल्याने या तालुक्यात पेरणी क्षेत्र जास्त आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी दोन लाख १३ हजार २०९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून यापैकी एक लाख ५७ हजार ३२१ हेक्टरवर पेरणीची कामे झाली आहेत. रब्बी ज्वारीचे एक लाख ३५ हजार ५५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी एक लाख १८ हजार ९४६ हेक्टर पेरणी झाली आहे.

मक्याचे १० हजार ११७ हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त १४ हजार ११७ हेक्टर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे २७ हजार ७५३ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी १८ हजार ८७४ पेरणी झाली आहे. गव्हाचे ३७ हजार ३७४ हेक्‍टर क्षेत्रापैकी १४ हजार ११७ हेक्टरवर लागवड झाली आहे.

तालुकानिहाय क्षेत्र हेक्टरमध्ये

सातारा १२३०३, जावळी ३६३१, पाटण ६५५३, कऱ्हाड ६६२७, कोरेगाव १६८६५, खटाव २८१८२, माण ४१२८५, फलटण २४३९१, खंडाळा ७७६५, वाई ९७६०, महाबळेश्वर ६११.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Uddhav Thackeray: शेतकरी भाजपमध्ये आल्यास कर्जमाफी लगेच देतील: उद्धव ठाकरे

Natural Industries Group: ‘नॅचरल’ला ५५ कोटी नऊ लाख रुपये नफा

Peek Pahani : 'पीक पाहणी'बाबत सरकारचा मोठा निर्णय, पीक विमा मदतीचा अडथळा दूर

AI in Farming: शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा : डॉ. पाटील

Agrowon Podcast: कांदा दर दबावातच; वांगी आवक स्थिर, शेवग्याला मागणी कायम, ज्वारीचे दर कमीच तर बाजरीचे दर टिकून

SCROLL FOR NEXT