Chh. Sambhajinagar News : जिल्ह्यातील सरासरी १ लाख ९० हजार ९३५ हेक्टर क्षेत्रापैकी २२ नोव्हेंबर अखेरपर्यंत ९० हजार ५८८ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. यंदाच्या रब्बी हंगामासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीची सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ९० हजार ९३५ हेक्टर इतके आहे.
एकूण सरासरी क्षेत्रामध्ये हरभऱ्याची सरासरी क्षेत्र ५२ हजार ८६६ हेक्टर असताना प्रत्यक्षात २४ हजार ६१८ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ४६३७७ हेक्टर असताना प्रत्यक्षात २२ हजार ७१० हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली.
गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ६९ हजार ४०० हेक्टर असताना प्रत्यक्षात २९ हजार ५९४ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार ९८६ हेक्टर असताना प्रत्यक्षात १३ हजार ३६५ मकाची पेरणी झाली.
इतर तृणधान्याची सर्वसाधारण क्षेत्र २६७ हेक्टर असताना केवळ ८५ हेक्टरवर इतर तृणधान्याची पेरणी झाली. इतर कडधान्याचे सर्वसाधारण क्षेत्र ९८ हेक्टर असताना प्रत्यक्षात इतर कडधान्याची लागवड झालीच नव्हती. करडईचे सर्वसाधारण क्षेत्र ४३० हेक्टर असताना केवळ ६ हेक्टरवरच करडईची पेरणी झाली.
जवसाचे सरासरी क्षेत्र १४ हेक्टर असताना प्रत्यक्षात या पूर्ण क्षेत्रावर जवसाची पेरणी झाली. तिळाचे सर्वसाधारण क्षेत्र २७ हेक्टर असताना प्रत्यक्षात तिळाची लागवड झाली नाही. सूर्यफुलाचे सर्वसाधारण क्षेत्र २१६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५१ हेक्टरवर तर इतर गळीत धान्यांचे सरासरी क्षेत्र ४५४ हेक्टर असताना केवळ ३७ हेक्टरवर इतर गळीतधान्याची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
निवडणुकीचा प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र संकलनावर परिणाम
निवडणुकीच्या कामी लागलेल्या कृषी विभागाचे यंत्रणेला पेरणीचे नेमके क्षेत्र किती याचे संकलन करणे शक्य झाल्याचे दिसत नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्ह्यात रब्बी ज्वारी व मका पिकाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. प्रत्यक्षात २२ नोव्हेंबर पर्यंतच्या आकडेवारीत मात्र तसे दिसत नाही. दुसरीकडे गहू, हरभरा या पिकाची पेरणी मात्र अजूनही सुरूच आहे.
सोमवारी (ता. २५) कृषी विभागाच्या सर्व तालुक्यातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांच्या बैठका आयोजित करण्यात आल्या होत्या. या बैठकीनंतरच नेमक पेरणीचे क्षेत्र किती हे स्पष्ट होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.