Jowar Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : कमी ओलीवर ज्वारीची पेरणी

Rabi Sowing : सलग दोन-अडीच महिने पाऊसच न झाल्याने या पिकांची वाढ खुंटली, तर हलक्या जमिनीतील अनेक पिके जळाली.

Team Agrowon

Shevgaon News : अत्यल्प पावसामुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. पावसाअभावी जमिनीत पुरेशी ओल नसल्याने व घटलेल्या भूजल पातळीमुळे रब्बी हंगामाबाबतदेखील शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.

त्यामुळे काही प्रमाणात रब्बीच्या पूर्व मशागतीची कामे, तर बऱ्यापैकी पाऊस असलेल्या भागात पेरणीची कामे सुरू आहेत. मात्र, दमदार पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा मात्र आभाळाकडे लागल्या आहेत.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जूनपासून पावसाने ओढ दिल्याने खरिपातील कपाशी, तूर, मूग, कांदा व सोयाबीन या पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. सलग दोन-अडीच महिने पाऊसच न झाल्याने या पिकांची वाढ खुंटली, तर हलक्या जमिनीतील अनेक पिके जळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी बियाणे, मशागत, खते, फवारण्या यावर केलेला मोठा खर्चदेखील वाया गेला आहे.

कपाशीची वाढ खुंटल्याने त्याचा उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये काही प्रमाणात आलेल्या पावसाने थोडासा दिलासा दिला असला, तरी ऑक्टोबरमधील उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा निघून गेला आहे.

नदी-नाल्यांना व बंधाऱ्यांत पाणी नसल्याने भूजल पातळी कमालीची घटली आहे. आशा परिस्थितीत तोंडावर आलेल्या रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरू आहे. मात्र, पेरणीसाठी पुरेशी ओल नसल्याने शेतकरी पूर्वमशागतीच्या कामात व्यग्र आहेत.

रब्बी ज्वारीचे कोठार असलेल्या अमरापूर, फलकेवाडी, आव्हाणे, ढोरजळगाव, मळेगाव, सामनगाव, वडुले, वाघोली, निंबेनांदूर परिसरात कमी-अधिक प्रमाणात पेरण्यांना सुरुवात झाली. मात्र, पावसाअभावी शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत.

चांगला पाऊस न झाल्यास खरिपाप्रमाणेच रब्बी हंगामदेखील शेतकऱ्यांच्या हातून जाण्याची शक्यता असून, त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार आहे. दोन्ही पिकांवरील खर्चामुळे शेतकरी कर्जबाजारी होण्याची शक्यता वाढली आहे. पाऊस न झाल्यास आगामी काळात चारा व पाण्याची टंचाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

यंदा पावसाअभावी खरिपाच्या पिकांना फटका बसला. त्यावर केलेला खर्च वाया गेला. अद्याप पुरेसा व समाधानकारक पाऊस नसल्याने रब्बीच्या पेरण्या रखडल्या आहेत. आगामी काळात पिण्याचे पाणी व जनावरांचा चारा याबाबतची धास्ती वाढली आहे.
- शिवाजी अर्जुन, शेतकरी, सामनगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sharad Pawar Meets PM Modi: शरद पवार, सुप्रिया सुळेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट, अचानक भेटीमुळे राजकीय वतुर्ळात चर्चा, नेमकं कारण काय?

Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे

Agriculture Machinery: जुन्या रिक्षा इंजिनापासून बहुउपयोगी कृषी यंत्र

Enterotoxemia In Goats: पावसाळ्यात शेळ्या-मेंढ्यांमध्ये आंत्रविषाराचा धोका, वेळीच करा प्रतिबंध

Jowar Procurement Scam: हमीभावाने ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहार

SCROLL FOR NEXT