Jowar Sowing : ज्वारीच्या उत्पादकता वाढीसाठी सुधारित पद्धतीने पेरणी करावी

Rabi Jowar : उत्पादकता वाढीसाठी रब्बी ज्वारीची सुधारित पद्धतीने लागवड करावी. ज्वारीच्या धान्याची प्राथमिक प्रक्रिया, प्रतवारी, पॅकिंग करून विक्री, प्रक्रिया उत्पादने तयार करून विक्री करावी.
Jowar
JowarAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : उत्पादकता वाढीसाठी रब्बी ज्वारीची सुधारित पद्धतीने लागवड करावी. ज्वारीच्या धान्याची प्राथमिक प्रक्रिया, प्रतवारी, पॅकिंग करून विक्री, प्रक्रिया उत्पादने तयार करून विक्री करावी.

त्याद्वारे मूल्यवर्धन होऊन अधिक नफा मिळवता येईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय ज्वार सुधार प्रकल्प-ज्वार संशोधन केंद्र यांच्या मार्फत आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत शुक्रवारी (ता. १३) जांब (ता. परभणी) येथील शेतकऱ्यांना परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या रब्बी ज्वारीच्या विविध सुधारित वाणाचे त्यात परभणी सुपर मोती, परभणी शक्ती आणि सीएसव्ही-२९ आर बियाणे व बीज प्रक्रियेसाठी गाऊचो, ट्रायकोबूस्ट हे घटक, सुधारित लागवड तंत्रज्ञान घडीपुस्तिका वाटप करण्यात आले.

Jowar
Rabi Jowar Sowing : रब्बी ज्वारी पेरणीला सुरुवात

या वेळी डॉ. वासकर बोलत होते. प्रगतिशील शेतकरी बालासाहेब रेंगे, ज्‍वार पैदासकार डॉ. एल. एन. जावळे, ज्वार रोगशास्ञज्ञ डॉ. के. डी. नवगिरे, अभास कृषिरत्न महिला प्रकल्प केंद्र समन्वयक डॉ. सुनीता काळे, सहायक ज्वार कृषिविद्यावेत्ता प्रीतम भुतडा, प्रसाद देशमुख उपस्थित होते.

Jowar
Jowar Sowing : रब्बीत शेतकऱ्यांचा कमी पाण्यावरील पिकांवर भर ; ज्वारीच्या पेरण्यांची लगबग सुरू

डॉ. जावळे यांनी सुधारित वाणांचे वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली. आद्यरेषीय पीक प्रात्यक्षिकांचे योग्य व्यवस्थापन करावे, असे सांगितले. डॉ. काळे यांनी भरडधान्याचे आहारामधील महत्त्व व पदार्थ निर्मितीवर माहिती दिली.

डॉ. नवगिरे यांनी ज्वारीवर येणारे विविध रोग, बीजप्रक्रिया आणि जैविक निविष्ठांच्या वापरावर, तर भुतडा यांनी ज्वारीची सुधारित लागवड तंत्रज्ञान, खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापनावर माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com