Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : पेरणीपूर्ण मशागतीची कामे पूर्ण

Agricultural Cultivation Works : मागील काही दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडल्याने शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत.

Team Agrowon

Buldhana News : मागील काही दिवसात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडल्याने शेतीच्या मशागतीची कामे शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहेत. आता सार्वत्रिक मोसमी पाऊस पडल्यानंतरच खरिपाची पेरणी करणे योग्य ठरणार असल्याने शेतकरी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

साखरखेर्डा परिसरात तीन, नऊ आणि १० जूनला वादळीवाऱ्यासह पडल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतकरी पुढे सरसावला आहे. हा पूर्वमोसमी पाऊस काही भागातच पडल्याने आजही शेतकरी मोसमी पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. साखरखेर्डा भागातील गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, सावंगी माळी, वडगावमाळी, सायाळा, शेंदुर्जन जागदरी, आंबेवाडी या भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मात्र, शिंदी परिसरात अद्याप दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. काही भागात शेतातून पाणी वाहिले, तर काही ठिकाणी पाणी तुंबले होते.

त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून शेती पेरणी योग्य करून ठेवली असून सोयाबीन, मूग, उडीद, तूर यांची पेरणी थांबवली आहे. मागील वर्षी मूग आणि उडीद ही पीके उगवलीच नव्हती. मूग, उडीद यांचा पेरणी हंगाम निघून गेल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली होती. यावर्षी जमिनीत किमान ९ इंच ओल आल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन कृषी अधिकारी गणेश बंगाळे यांनी केले आहे. त्यामुळे सोयाबीन पेरणी थांबली आहे.

जमिनीत सहा इंचापेक्षा जास्त किमान नऊ इंच ओल निर्माण होत नाही. तोपर्यंत सोयाबीनसह खरिपाची पेरणी करू नये.
गणेश बंगाळे, कृषी पर्यवेक्षक, साखरखेर्डा
शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून पेरणीसाठी शेती तयार केली आहे. मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेता पेरणीची घाई करण्याऐवजी योग्य पाऊस पडल्यानंतरच पेरणी करण्यात येईल.
रामदास सिंग राजपूत, शेतकरी, साखरखेर्डा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT