Agriculture Sowing : पुरेशा पावसाअभावी पश्चिम विदर्भात पेरण्या खोळंबल्या

Sowing Update : सक्रिय झालेला मॉन्सून रखडल्याने अर्धाअधिक जून महिना लोटला तरीही या विभागात पाच ते सात टक्केच पेरणीखाली आले आहे.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Akola News : यंदा मृग नक्षत्रात पावसाने हजेरी लावल्याने पेरण्यांना लवकरच प्रारंभ होईल, अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली होती. मात्र, सक्रिय झालेला मॉन्सून रखडल्याने अर्धाअधिक जून महिना लोटला तरीही या विभागात पाच ते सात टक्केच पेरणीखाली आले आहे. सर्वदूर पावसाअभावी पेरण्यांना विलंब होत चालला आहे.

अकोला जिल्ह्यात सिंचन क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली आहे. त्याशिवाय तेल्हारा तालुक्यात काही भागांत पाऊस झाल्याने तिकडे पेरण्या सुरू झाल्या. आतापर्यंत जिल्ह्यात पाच हजार हेक्टरपर्यंत पेरणी झालेली असावी अशी शक्यता आहे. अद्याप सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस नसल्याने खरिपाचे सुमारे साडे चार लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे.

Kharif Season
Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात ४,१८५ हेक्टरवर खरीप पेरणी

बुलडाणा जिल्ह्यात तुलनेने काही भागांत पाऊस झाल्याने ४० हेक्टरपर्यंत पेरणी पोहोचू शकली. सोयाबीनची साडे तेरा हजार, तूर ६७००, मका ३५००, कपाशी १९००० तर मुगाची ५० हेक्टरपर्यंत पेरणी होऊ शकलेली आहे. बुलडाणा जिल्ह्यात खरीप हंगामात सात लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र राहणार आहे. यासाठी कृषी खात्याने बी-बियाणे, खतांचे नियोजन केलेले आहे. जिल्ह्यात बहुतांश मंडलांमध्ये ७५ ते १०० मिलिमीटरपर्यंत पाऊस झालेला नसल्याने पेरण्यांना वेग आलेला नाही.

Kharif Season
Kharif Sowing : पुणे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात

वाशीम जिह्यात रिसोड, मालेगाव या दोन तालुक्यात पाऊस बऱ्यापैकी झालेला असल्याने तेथे पेरण्यांना वेग आला आहे. मालेगावमध्ये २६८९५ हेक्टर म्हणजेच सुमारे ४० टक्के तर रिसोडमध्ये २७२५५ (३८ टक्के) हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. वाशीम तालुक्यात १३६४८ हेक्टर (१७ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. या हंगामात चार लाख ५ हजार हेक्टरचे नियोजन झालेले आहे.

सोयाबीन लागवडीला पसंती

पश्चिम विदर्भात या हंगामात सोयाबीन लागवडीला शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. यादृष्टीने सोयाबीनच्या नामांकीत वाणांसाठी शेतकऱ्यांची ओढाताण झाली आहे. काही वाणांसोबत यंदा दुसऱ्या वाणांची लिकिंगही करण्यात आल्याचे प्रकार घडलेले आहेत.

मॉन्सून कमजोर

मॉन्सूनचे आगमन होऊन जवळपास आठवडा होत आहे. मात्र, अद्याप दमदार पाऊस बरसलेला नाही. पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाचे चटके बसत आहेत. हा प्रकार बळीराजाची चिंता वाढवत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने मध्यंतरी पावसाचा इशारा दिला होता. मात्र, कमजोर मॉन्सूनमुळे पाऊस झाला नाही. आकाशात दररोज ढग जमा होतात. मात्र काही वेळात अचानक गायब होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com