Poultry Feeding: कोंबड्यांना थंडीमध्ये ऊर्जायुक्त आहाराची गरज असते; कारण थंडीमध्ये उबदार राहण्यासाठी त्यांची बरीच ऊर्जा खर्च होते. त्या ऊर्जेची गरज आहारातून भरावी लागते. त्यामुळे कुक्कुटपालनात हिवाळ्यानुसार ऊर्जायुक्त आहार, आहारातील घटक, त्याचं योग्य प्रमाण, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी औषधे दिल्याने पक्ष्यांवर थंडीचा विपरित परिणाम होत नाही तसेच त्यांचे आरोग्यही उत्तम राहते..ऊर्जायुक्त आहारहिवाळ्यात कोंबड्यांना ऊर्जायुक्त आणि स्निग्ध पदार्थांची गरज जास्त असते. बाकी वेळेस कोंबड्यांना २६०० ते २७०० किलो कॅलरी देणारे खाद्य लागते तर हिवाळ्यात त्यांना २८०० ते २९०० किलो कॅलरी देणाऱ्या आहाराची गरज असते. म्हणजे जर एक कोंबडी दररोज १०० ग्रॅम खाद्याचे सेवन करत असेल तर तिला थंडीमध्ये १२० ते १३० ग्रॅम खाद्य द्यावे. सोबत तेलाचे प्रमाणही वाढवावे..Poultry Farming: कुक्कुटपालनाचा छंद झाला चांगला आर्थिक आधार .खाद्याचे घटककोंबड्यांचा आहार अधिक ऊर्जायुक्त होण्यासाठी त्यांच्या आहारात मका, सूर्यफूलाच्या बिया, ज्वारी, बाजरी हे धान्य भरडून द्यावे. याशिवाय खाद्ययुक्त तेल जसे सोया तेल, फुड ग्रेडेड ऑईल, सूर्यफूल तेल कोंबड्यांना द्यावे. नेहमी ४ ते ५% तेल दिले जात असेल तर थंडीमध्ये ते ५ ते ६ % द्यावे. थंडी भरपूर वाढल्यास कोंबड्यांना २-३ दिवस गुळाचं पाणी द्यावे. जेणेकरुन त्यांना तात्काळ ऊर्जा मिळेल..खर्चात बचतकोंबड्यांचा ऊर्जायुक्त आहार वाढवणे आवश्यक असते. यासाठी आहाराचे प्रमाण वाढल्याने खर्चात वाढ होत असेल तर कुक्कुटपालक आहारात काही बदल करुन खर्चात बचत करु शकतात. कोंबड्यांना एरव्ही दिले जाणारे व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्सचे प्रमाण थोडे कमी केले तरी थोड्या वेळापुरते चालते. त्यामुळे खर्चात बचत करता येते, असे अहिल्यानगर जिल्ह्यातील सहायक आयुक्त डॉ. अतुल पाटणे यांनी सांगितले..फिडरसची संख्याथंडीमध्ये कोंबड्यांच्या शेडमध्ये फिडरसची संख्या वाढवावी. जेणेकरुन पक्ष्यांना फार फिरावे लागत नाही आणि त्यांची ऊर्जा वाचते. शिवाय जवळच फिडरस असल्याने त्यांच्या आहारात वाढ होण्यास मदत होते..रोगप्रतिकारक शक्तीहिवाळा हा व्हायरच्या वाढीचा काळ असतो. त्यामुळे कोंबड्यांचे व्हायरस आणि इतर रोगांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे औषध द्यावे. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, सेलेनियम किंवा मल्टीव्हिटॅमिन द्यावे. कंपनीने दिलेल्या प्रमाणानुसार ते कोंबड्यांना द्यावे. यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच शिवाय त्यांच्यावरील ताणही कमी होतो..कोमट पाणीहिवाळ्यात कोंबड्या थंड पाणी पित नाही. त्यामुळे कोंबड्यांना पिण्यासाठी कोमट पाणी दिले तर त्यांचे पाणी पिण्याचे प्रमाण वाढते आणि पचनही चांगले होते..डॉ. अतुल पाटणे, सहायक आयुक्त, अकोले, जि. अहिल्यानगर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.