Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्रातून भात शेती प्रात्यक्षिक

Paddy Farming : आंबेगाव तालुक्यात भात लागवडीच्या विविध तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करत आहेत. मात्र काही शेतकरी शून्य मशागतीचे तंत्र अवलंबत असून, त्यांना त्याचा फायदा होत आहे.
Zero Tillage Technique
Zero Tillage Technique Agrowon
Published on
Updated on

Pune News : आंबेगाव तालुक्यात भात लागवडीच्या विविध तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करत आहेत. मात्र काही शेतकरी शून्य मशागतीचे तंत्र अवलंबत असून, त्यांना त्याचा फायदा होत आहे.

राजेवाडी येथील शेतकरी गोरक्ष शिंदे, आकाश शिंदे, सोमनाथ साबळे, नीलेश साबळे तसेच गोहे खुर्द येथील राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त शेतकरी सखुबाई लोहकरे, सीताराम जोशी यांनी शून्य मशागत तंत्रातून भात शेती केली असून शेतीतील या प्रयोगातून विना नांगरणीची शेती सिद्ध करून दाखवली आहे.

Zero Tillage Technique
Zero Tillage Technique : शून्य मशागत तंत्राची उपयुक्तता

यंदा त्यांचे तिसरे वर्ष असून यामुळे त्यांच्या भात उत्पादनात मोठी वाढ होत आहे. एसआरटी तंत्रामध्ये आणि विना नांगरणीच्या शेतीमध्ये सुरुवातीलाच गादी वाफ्यावर पिकांची लागवड केली जाते व नंतर गादी वाफे न मोडता आणि कोणतीही मशागत म्हणजेच नांगरणी, कुळवणी, वखरणी न करता तसेच पाभारीने पेरणी न करता पुढील पिकांची टोकण पद्धतीने लागवड केली जाते. तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी निंदणी, भांगलणी किंवा कोळपणी न करता तणनाशकांचा वापर केला जातो.

Zero Tillage Technique
Zero Tillage Farming : शून्य मशागत तंत्रज्ञानाने होणार दहा हजार एकरांवर शेती

पिकांची काढणी करताना पिके जमिनीलगत कापून घेतली जातात आणि खोडाचे अवशेष (राख), धसकटे व मुळे तशीच ठेवली जातात. पिके किंवा तणे मुळासकट उपटून काढली जात नाहीत. त्यामुळे पिकांची व तणांची मुळे जमिनीत राहतात, कुजतात आणि त्यापासून सेंद्रिय खत तयार होते.

शून्य मशागत तंत्र राज्यातील भात, सोयाबीन, कापूस, मका, सूर्यफूल, हरभरा, झेंडू आदी पिकांसाठी कायदेशीर असल्याचा प्रयोगशील शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करून कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, गहू, इतर तृणधान्ये, तूर, मूग, उडीद, हरभरा, इतर कडधान्ये, भुईमूग, सूर्यफूल, मोहरी, जवस, तीळ, इतर तेलबिया, कांदा, भाजीपाला, फुलपिके, औषधी व सुगंधी पिकांची लागवड करणे शक्य आहे. यासाठी कृषी विभागाच्या डिंभे कृषी मंडळातील कृषी सहायक अरविंद मोहरे, रवींद्र पारधी, ज्ञानेश्वर लोहकरे यांचे मार्गदर्शन लाभले.

एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून केलेल्या भात शेतीमुळे उत्पादन खर्चात खूप बचत होऊन उत्पादन वाढले आहे. त्यामुळे आर्थिक फायद्यासाठी ही एक चांगली भात लागवड पद्धत आहे. कृषी विभागाने मला वेळोवेळी मार्गदर्शन करून या पद्धतीने भात शेती करण्यास प्रवृत्त केले.
- सखुबाई लोहकरे, राज्य शासन पुरस्कार प्राप्त शेतकरी, गोहे खुर्द, ता. आंबेगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com