डॉ. अभिनंदन पाटील, डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अशोक कडलगसुरू हंगामात ऊस लागवड करताना शिफारशीत जातींची निवड करावी. हलक्या, मुरमाड जमिनीत ४.५ फूट आणि भारी जमिनीत ५ फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवावे. यामुळे मुळांची वाढ, सूर्यप्रकाश आणि हवा खेळती राहते. यांत्रिकीकरण सुलभ होते. मुळे, पांकशा किंवा तुरा फुटलेले बेणे वापरू नये. खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेण्यासाठी ८ ते १० महिन्यांचे ऊस वापरावा. .सुरु ऊस लागवडीपूर्वी मातीचे परीक्षण करणे अत्यावश्यक आहे. खोल नांगरट करणे तसेच समस्याग्रस्त जमिनीत कठीण तळी फोडण्यासाठी ४५ ते ६० सेमी खोल सबसॉयलरचा वापर करणे आवश्यक आहे. नांगरट करताना एकरी शेणखत १० टन किंवा कंपोस्ट खत ५ टन किंवा गांडूळ खत २ टन किंवा कारखान्याची कुजलेली मळी २ टन किंवा कोंबडी खत २ टन आणि २ किलो ट्रायकोडर्मा, २ किलो पीएसबी, २ किलो केएमबी हे सेंद्रिय खतात मिसळून वापर करावा..Sugarcane Farming: समाधानकारक पावसामुळे दुष्काळी पट्ट्यातही ऊस लागवड.पूर्वमशागत केल्याने जमिनीचा पाण्याचा निचरा सुधारतो, हवा खेळती राहते आणि मुळांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे क्षारांचे प्रमाण कमी होऊन जमिनीचा भुसभुशीतपणा टिकतो. जमिनीत उपयुक्त जिवाणूंची संख्या वाढते, हवा व पाण्याचा समतोल राखला जातो, सूक्ष्म कणांची रचना सुधारते आणि जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मात लक्षणीय सुधारणा होते..Sugarcane Farming: पूर्वहंगामी उसाच्या आधुनिक लागवड तंत्राने उत्पादनात लक्षणीय वाढ.खोल नांगरटीनंतर कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन सपाट करावी. रिजरच्या साह्याने सऱ्या पाडाव्यात. सऱ्यांची खोली २० ते २५ सेंमी ठेवावी. दिशा दक्षिणोत्तर असावी.हलक्या, मुरमाड जमिनीत ४.५ फूट आणि भारी जमिनीत ५ फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवावे, ज्यामुळे मुळांची वाढ, सूर्यप्रकाश व हवा खेळती राहते आणि यांत्रिकीकरण सुलभ होते.योग्य सऱ्या पाडल्यास एकरी ४० ते ४५ हजार उसांची संख्या मिळते, ठिबक सिंचन व पीक संरक्षण करणे सुलभ होते, प्रकाशसंश्लेषण क्रिया वाढते, उसाची जाडी सुधारते, त्यामुळे ऊस उत्पादन व साखर उतारा वाढतो..बेणे रसरशीत, सशक्त, लांब कांडीचे, रोग आणि किडमुक्त असावे. बेण्यावरील डोळे फुगीर, तजेलदार व पूर्ण विकसित असावेत, काळपट किंवा निस्तेज डोळे नसावेत.बेण्यासाठी ८ ते १० महिन्यांचे ऊस वापरावा, कारण त्यात साखर ग्लुकोज स्वरूपात असते आणि विद्राव्य नायट्रोजन सुमारे ०.३० टक्के असतो.मुळे, पांकशा किंवा तुरा फुटलेले बेणे वापरू नये. खोडवा ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेणे लांबून आणावे लागल्यास किंवा लागणीत उशीर झाल्यास ५०० ग्रॅम चुना २०० लिटर पाण्यात विरघळून त्या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवावे, यामुळे उगवण चांगली होते..Sugarcane Farming: पूर्वहंगामी ऊसाची आधुनिक लागवड देते जास्त उत्पादन.१०० लिटर पाण्यामध्ये १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम अधिक ३६ ग्रॅम इमिडाक्लोप्रिड मिसळून द्रावण तयार करावे. त्यामध्ये ऊस बेणे १० ते १५ मिनिटे बुडवावे. त्यानंतर ३० मिनिटांनी १०० लिटर पाण्यामध्ये १ लिटर ॲसिटोबॅक्टर मिसळून द्रावण तयार करावे. यामध्ये ३० मिनिटे बेणे बुडवून ठेवावे.मध्यम ते भारी, क्षारपड किंवा चोपण जमिनीत कोरडी लागण आणि हलक्या जमिनीत ओली लागण करावी.ऊस लागण केल्यापासून पहिल्या सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत तण नियंत्रण, नांग्या भरणे, बाळभरणी, मोठी बांधणी, फुटव्यांचे नियंत्रण, पाचट काढणे, पाचटाचे आच्छादन करावे. या बाबी उसाच्या जोरदार वाढीसाठी फायद्याच्या असतात..गंधक, सिलिकॉनचा वापरलागवडीच्या वेळी प्रति एकरी २४ किलो मूलद्रवी गंधक तसेच सिलिकॉनसाठी १६० किलो सिलिकॉन बगॅसची राख आणि १ लिटर सिलिकॉन उपलब्ध करून देणारे जिवाणू संवर्धकाचा वापर करावा..शिफारशीत जातीको. ८६०३२ : मध्यम उशिरा तयार होणारी, जास्त फुटवे, खोडवा चांगला, काणी रोगास मध्यम प्रतिकार, चांगले ऊस आणि साखर उत्पादन, जैविक अजैविक ताणास उत्तम, पक्व कांड्यांना भेगा पडतात.व्हीएसआय ०८००५ : पाण्याचा ताण सहन करते, खोडवा चांगला येतो, काणी, तांबेरा रोगास मध्यम प्रतिकारक, दशी पडत नाही, तुरा येण्याचे प्रमाण कमी. .कोव्हीएसआय ०३१०२ : अतिपर्जन्याच्या भागासाठी, जास्त उत्पादन आणि साखर उतारा.कोसी ६७१: गुळासाठी उत्तम, जास्त उत्पादन व साखर उतारा.व्हीएसआय ४३४ : लवकर पक्व होणारी, मध्यम जाड व समाधानकारक उत्पादन देणारी.को. ९४०१२: जाड ऊस अधिक उत्पादन व साखर उतारा.कोव्हीएसआय ३१०२: अधिक उत्पादन व साखर उतारा.कोव्हीएसआय १८१२१: जाड ऊस, अधिक उत्पादन व साखर उतारा.- डॉ. अभिनंदन पाटील ९७३७२७५८२१- डॉ. समाधान सुरवसे ९८६०८७७०४९(वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, मांजरी बु., पुणे).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.