Kharif Sowing : पुणे जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात

Kharif Season : जून महिना सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस झाले आहेत. जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने खरिपाच्या वेळेवर पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon

Pune News : जून महिना सुरू होऊन जवळपास पंधरा दिवस झाले आहेत. जूनच्या सुरुवातीला चांगला पाऊस पडल्याने खरिपाच्या वेळेवर पेरण्यांना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या एक लाख ९५ हजार ७१० हेक्टरपैकी ९७९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पश्चिमेकडील पट्यात भात रोपवाटिकेचे कामे वेगाने सुरू असून बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात झाली आहे.

यंदा हवामान विभागाने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक परिस्थिती नसताना पीककर्ज घेऊन खरिपाची तयारी केली होती. अनेकांनी खते, बियाणांची खरेदी केली आहे. मात्र, जूनच्या पहिल्या आठवड्यात पुरंदर, बारामती या भागासह इतर अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडला. प्रामुख्याने पूर्व भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला.

Kharif Sowing
Kharif Sowing : जोरदार पावसामुळे खरीप पेरणीला ब्रेक

बारामतीतील सणसरमध्ये ३९०.८ मिलिमीटर, बारामतीत ३२१.३, तर दौंडमध्ये २८७.४ मिलिमीटर, पाटस २७२.९, इंदापूर २४१.२, मिलिमीटर पाऊस पडला. तर इतर मंडळातही शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या वेळेवर होण्यास मदत होणार आहे.

गेल्या आठवड्यापासून पावसाने पडण्यास सुरुवात केली असली तरी पूर्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौड, खेड भागांत पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागात अजूनही शेत वाफसा स्थितीत आलेले नाहीत. ज्या ठिकाणी वाफसा होत आहे. त्याठिकाणी पेरण्यांना सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील जुन्नर, आंबेगाव तालुक्यांत बऱ्यापैकी खरिपाच्या पेरण्या झाल्याचे चित्र आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : सातारा जिल्ह्यात ४,१८५ हेक्टरवर खरीप पेरणी

जिल्ह्यात भाताचे सरासरी ५९ हजार ६२७ हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी तीन हजार २४० हेक्टरवर रोपवाटिका झाल्या आहेत. तर आतापर्यंत ४० हेक्टरवर प्रत्यक्ष पेरणी झाली आहे. बाजरीचे सरासरी ४७ हजार ५१८ हेक्टरपैकी १५१ हेक्टर पेरणी झाली आहे. मक्याची १८ हजार ८२८ हेक्टरपैकी २८९ हेक्टर, मूग पिकांची १४ हजार ९६१ हेक्टरपैकी १९ हेक्टर, उडदाचे १७१५ हेक्टरपैकी ४७ हेक्टर, सोयाबीनची २० हजार ९८२ हेक्टरपैकी ३२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

तालुकानिहाय झालेली पेरणी (हेक्टरमध्ये)

तालुका --- पेरणीचे क्षेत्र

हवेली --- २५

मावळ --- २०

खेड --- ४२७

आंबेगाव -- ४०

बारामती -- ३९८

दौंड -- ६३

पुरंदर -- ५

यंदा जूनच्या पहिल्या पंधरवड्यात चांगला पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हवेली, मावळ, खेड, आंबेगाव, बारामती भागांत पेरणीस सुरुवात झाली आहे. येत्या काळात चांगला पाऊस झाल्यास वेळेवर पेरण्या होऊन खरिपाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.
- संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com