Jowar Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Jowar Farming : जमिनीच्या खोलीनुसार पेरा रब्बी ज्वारीचे वाण

Jowar Cultivation : कोरडवाहू क्षेत्रात चांगल्या रीतीने येणारे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून रब्बी ज्वारीची लागवड केली जाते.

Team Agrowon

डॉ. आदिनाथ ताकटे, डॉ. विजू अमोलिक

Jowar Farming Management : कोरडवाहू क्षेत्रात चांगल्या रीतीने येणारे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक म्हणून रब्बी ज्वारीची लागवड केली जाते. दर्जेदार उत्पादनासाठी रब्बी ज्वारीच्या संकरित व सुधारित जातीचे शुद्ध बियाणे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणे आवश्यक असते. कारण या बियाणांची उत्पादन क्षमता स्थानिक वाणांपेक्षा जास्त असते. तसेच अधिक उत्पादनासाठी जमिनीच्या खोलीनुसार वाणांची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते.

त्याकरिता ज्वारीच्या योग्य वाणांची उपलब्धता करणे आवश्यक आहे. या अनुषंगाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जमिनीच्या खोलीनुसार ज्वारीचे विविध वाण विकसित केले आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्वारी ज्वारीची लागवड ही १५ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या दरम्यान करण्याची शिफारस केलेली आहे. तरी राज्यातील काही भागात गोकूळ अष्टमीपासून पेरणीला सुरुवात होते.

कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी वाण

हलकी जमीन (खोली ३० सें.मी) : फुले यशोमती, फुले अनुराधा, फुले माऊली.

मध्यम जमीन (खोली ६० सें.मी) : फुले सुचित्रा, फुले माऊली, परभणी मोती, मालदांडी ३५-१,

भारी जमीन (६० सें.मी पेक्षा जास्त) : सुधारित वाण ः फुले वसुधा, फुले यशोदा, सी.एस.व्ही २२, पी.के.व्ही. क्रांती, परभणी, मोती, फुले पूर्वा

संकरित वाण : सी.एस.एच.१५ आणि सी.एस.एच. १९

बागायतीसाठी : फुले रेवती, फुले वसुधा, सी.एस.व्ही.१८, सी.एस.एच.१५, सी.एस.एच. १९

हुरड्यासाठी फुले उत्तरा, फुले मधुर

लाह्यांसाठी : फुले पंचमी

पापडासाठी : फुले रोहिणी

फुले यशोमती

प्रसारण वर्ष : २०२१

पश्चिम महाराष्ट्रातील जिरायती क्षेत्रातील उथळ जमिनीसाठी शिफारशीत

पक्वता कालावधी- ११२ ते ११५ दिवस

पांढऱ्या आकाराचे गोलाकार दाणे

धान्य उत्पादन : हेक्टरी ९.२ क्विंटल

चारा उत्पादन : हेक्टरी ४२.६ क्विंटल

फुले अनुराधा

कोरडवाहू क्षेत्रासाठी, हलक्या जमिनीसाठी लागवडीस योग्य.

पक्व होण्याचा कालावधी : १०५ ते ११० दिवस.

वैशिष्ट्ये

अवर्षणास प्रतिकारक्षम, भाकरी उत्कृष्ट, चवदार, कडबा अधिक पौष्टिक व पाचक

खोडमाशीस प्रतिकारक्षम

कोरडवाहू धान्य उत्पादन : हेक्टरी ८ ते १० क्विंटल, कडबा उत्पादन ः ३० ते ३५ क्विंटल.

फुले माऊली

हलक्या व मध्यम जमिनीसाठी लागवडीस योग्य

पक्व होण्याचा कालावधी ः ११० ते ११५ दिवस

वैशिष्ट्ये

भाकरीची चव उत्तम

कडबा पौष्टिक व चवदार

हलकी जमीन :

धान्य उत्पादन : हेक्टरी ७ ते ८ क्विंटल, कडबा उत्पादन ः २० ते ३० क्विंटल

मध्यम जमीन :धान्य उत्पादन हेक्टरी १५ ते २० क्विंटल, कडबा उत्पादन ः ४० ते ५० क्विंटल.

फुले सुचित्रा

मध्यम जमिनीसाठी शिफारस

पक्व होण्याचा कालावधी : ११० ते ११५ दिवस

वैशिष्ट्ये

उत्कृष्ट धान्य व कडबा प्रत

धान्य उत्पादन : २४ ते २८ क्विंटल व कडबा उत्पादन ः ६० ते ६५ क्विंटल

फुले वसुधा

भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायती पेरणीसाठी उपयुक्त

पक्व होण्याचा कालावधी ः ११६ ते १२० दिवस

वैशिष्ट्ये

दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार

भाकरीची चव उत्तम

ताटे भरीव, रसदार व गोड

खोडमाशीस प्रतिकारक्षम

कोरडवाहू क्षेत्र

धान्य उत्पादन : हेक्टरी २४ ते २८ क्विंटल, कडबा उत्पादन ः ६५ ते ७० क्विंटल.

बागायती क्षेत्र

धान्य उत्पादन : हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल, कडबा उत्पादन ः ७० ते ७५ क्विंटल

फुले यशोदा

भारी जमिनीत लागवडीसाठी प्रसारित

पक्व होण्याचा कालावधी ः १२० ते १२५ दिवस

वैशिष्ट्ये

दाणे मोत्यासारखे, पांढरेशुभ्र चमकदार, भाकरीची चव चांगली

कोरडवाहू क्षेत्र ः धान्य उत्पादन ः हेक्टरी २५ ते २८ क्विंटल, कडबा उत्पादन ः ६० ते ६५ क्विंटल

बागायती क्षेत्र ः धान्य उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटल, कडबा उत्पादन ः ७०-८० क्विंटल.

- डॉ. आदिनाथ ताकटे, ९४०४०३२३८९,

- डॉ. विजू अमोलिक, ९४२१५८३५०६

(महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

Election Results Maharashtra 2024 : महाराष्ट्रावर महायुतीचेच राज्य

Pune Assembly Election Result : पुणे जिल्ह्यात महायुतीच !

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

SCROLL FOR NEXT