Dadar Jowar : दादर ज्वारीची आवक कमी; तरीही दर वाढेना

Jowar Rate : खानदेशात बाजार समित्यांत सध्या ज्वारीची आवक कमी आहे. पुढेही आवक कमी राहील. कारण ज्वारीचा पेरा कमी झाला आहे.
Jowar
JowarAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात बाजार समित्यांत सध्या ज्वारीची आवक कमी आहे. पुढेही आवक कमी राहील. कारण ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. यामुळे उत्पादन कमी येईल व शेतकऱ्यांकडेही ज्वारीचा साठा फारसा नाही. दरांबाबत समाधानकारक स्थिती नाही, पण दर २००० ते २२०० रुपये क्विंटलवर स्थिरावले आहेत. उठाव वाढल्यास दरवाढ होऊ शकते. पण तूर्त दर वाढणार नाहीत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दादर ज्वारीचे दर २००० ते २२०० रुपये प्रतिक्विंटलरवर स्थिर आहेत. एप्रिल ते जून या काळात आवक बऱ्यापैकी होती. आवक वाढताच दादर ज्वारीचे दर व्यापारी, अडतदारांनी एप्रिलमध्ये पाडले होते. परंतु दर आता किमान २२०० रुपयांवर स्थिर आहेत. सध्या व्यवहारदेखील गतीने होत नसल्याची स्थिती आहे. पण ज्वारीला अद्याप उठाव कमी आहे, असा मुद्दा खरेदीदार उपस्थित करीत आहेत.

Jowar
Dadar Jowar : सुसाट वाऱ्याने दादर ज्वारी आडवी

दादर ज्वारीचे दर एप्रिलच्या सुरवातीला कमाल २००० रुपये प्रतिक्विंटल होते. सुरवातीला जळगाव बाजार समितीत प्रतिदिन ५०० ते ६०० क्विंटल आवक सुरू होती. परंतु एप्रिलच्या मध्यात आवक वाढली, तसे दरही कमी झाले. एप्रिलमध्ये आवक प्रतिदिन १४०० क्विंटलवर पोचली. आवक वाढताच किमान दर १८०० व कमाल दर २००० रुपये एवढा झाला.

Jowar
Dadar Jowar : खानदेशात वाढली दादर ज्वारीची आवक

फक्त मार्चमध्ये काही शेतकऱ्यांच्या दादर ज्वारीला २३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. एप्रिलमध्ये सरासरी दर २००० रुपये प्रतिक्विंटल होता. याबाबत शेतकऱ्यांनी जळगाव, अमळनेर व चोपडा बाजार समितीत नाराजी व्यक्त करून दर पाडल्याचा आरोप अडतदारांवर केला. यानंतर अडतदारांनी आम्ही लिलावात सहभागी होणार नाही, असा पवित्रा घेतला. आता आवक कमी झाली आहे, पण ज्वारी विक्री - पाठवणुकीचे व्यवहार कमी झाले आहेत, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

हमीभाव मिळालाच नाही

दादर ज्वारीलाही यंदा दर कमी मिळाले. यामुळे अनेकांनी शासकीय केंद्रात ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली. पण शासनानेही उशिरा खरेदी सुरू केली. जळगाव जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार शेतकऱ्यांनी शासकीय ज्वारी खरेदी केंद्रांत ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली. परंतु यातील ४० टक्के शेतकऱ्यांच्या ज्वारीची खरेदी शासनाने केलेली नाही. ज्वारीला यंदा हमीभाव मिळालाच नाही. जुलैमध्ये दर हमीभाव गाठतील, अशी अपेक्षा होती. परंतु जुलैतही दर कमीच राहिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com