Lakshamanphal Agrowon
ॲग्रो विशेष

Health Benefits of Lakshamanphal: पोषणमूल्यांनीयुक्त लक्ष्मणफळ

Laxmanphal Uses: लक्ष्मणफळ हे पोषणमूल्यांनी समृद्ध असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. हाडे, हृदय, पचन आणि दाहक-विरोधी गुणधर्म असलेल्या या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Team Agrowon

डॉ. सुवर्णा गारे, डॉ. विक्रम जांभळे, डॉ. गणेश खळेकर

Lakshamanphal Health Advantages: लक्ष्मणफळ मानवी आरोग्यास अतिशय फायदेशीर आहे. हे फळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. याचे दाहक-विरोधी गुणधर्म संधिवात सारख्या परिस्थितीपासून आराम देतात. पचन आणि हाडांच्या आरोग्यास उपयुक्त आहे. रक्तदाब नियमन आणि निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी राखण्यास मदत करते.

लक्ष्मणफळाचे शास्त्रीय नाव अ‍ॅनोना म्यूरिकाटा आहे. हे झाड अनोन्यासी या कुळातील आहे. यास सोरसोप फ्रूट म्हटले जाते. हे मूळ अमेरिकेतील उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये, विशेषतः कॅरेबियन, मध्य अमेरिका आणि उत्तर दक्षिण अमेरिकेत आढळते. कालांतराने हे झाड आफ्रिका, आग्नेय आशिया आणि पॅसिफिकच्या काही भागात देखील आढळले. अंदमान-निकोबार बेटे, तामिळनाडू व केरळ राज्यात याची लागवड होते.

प्रथमदर्शनी सीताफळाच्या झाडासारखेच हे झाड दिसते.  हे झाड साधारणपणे १५ ते १८ फूट उंचीपर्यंत वाढते. याला बाहेरून काटेरी, हिरवी साल आणि आतून मऊ, पांढरा लगदा असलेले फळ येते. या झाडाची पाने सदाहरित असतात आणि पिवळ्या रंगाची फुले येतात.

फळाची चव गोड आणि तुरट चवींचे एक अद्वितीय मिश्रण आहे, ज्याची तुलना अनेकदा स्ट्रॉबेरी, अननस आणि लिंबूवर्गीय फळांच्या मिश्रणाशी केली जाते. हे फळ सामान्यतः ताजे खाल्ले जाते परंतु ते स्मूदी, मिष्टान्न आणि पेयांमध्ये देखील वापरले जाते.

हे फळ कर्करोगाच्या प्रतिकारासाठी उपयुक्त आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते.हे फळ कर्करोगाच्या पेशींवर उपचार करण्यास मदत करते.

कोणताही जिवाणू संसर्ग झाला असेल तर लक्ष्मण फळाचे सेवन करावे. या फळामध्ये ॲसिटोजेनिन्स, क्विनोलॉन्स आणि अल्कलॉइड्स सारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, ज्याचा थेट कर्करोग प्रतिबंध आणि ट्यूमरचा आकार कमी करण्याशी संबंधित आहे.

पानांचा काढा कर्करोगींसाठी संजीवनी मानला जातो.

फळात सुमारे २१२ फायटोकेमिकल्स असतात, यात अल्कलॉइड्स मेगास्टिग्मन्स, फ्लेव्होनॉल ट्रायग्लिसराइड्स, फिनोलिक्स, सायक्लोपेप्टाइड्स आणि आवश्यक तेलांचा समावेश आहे.

फळात कर्बोदके, डाय ट्री फॅट, प्रथिने, तंतुमय पदार्थ, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, तांबे व लोह जास्त असते. लायकोसीनचे प्रमाण अधिक आहे. अल्सर, हाडांचे आजार, यकृत, स्वादुपिंड यांच्या आजारावर ते गुणकारी समजले जाते.

पिकातील वेगळेपण, एकसारखेपणा, स्थिरीकरण आदी गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी पीक वाण तपासणी केंद्रातर्फे या पिकांचा अभ्यास होत आहे.

आरोग्यवर्धक फायदे

‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. जीवनसत्त्व क मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. शरीराला संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण मिळते.

दाहक-विरोधी गुणधर्म असलेली एसीटोजेनिन्स आणि अल्कलॉइड्स ही संयुगे आहे. ही संयुगे शरीरातील दाह कमी करण्यास मदत करू शकतात, ज्यामुळे संधिवात किंवा इतर दाहक विकारांसारख्या आजार असलेल्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो.

फळातील एसीटोजेनिन हे कर्करोगाच्या पेशींवर सायटोटॉक्सिक प्रभाव पाडू शकतात, ज्यामुळे त्यांची वाढ आणि प्रसार रोखू शकतात. प्रयोगशाळांमध्ये याबाबतचे संशोधन चालू आहे.

हे फळ कॅल्शिअम व मॅग्नेशिअमचा उत्तम स्रोत असून हाडांना मजबुती देते. नियमित सेवन केल्याने ओस्टीओपोरोसीस सारखा आजार टाळता येतो.

तंतूमय घटकांचा चांगला स्रोत आहे, जो निरोगी पचनसंस्था राखण्यासाठी आवश्यक आहे. नियमित आतड्यांच्या हालचालींना चालना देण्यास मदत करते, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते. आतड्यांच्या एकूण आरोग्यास चालना देते. यामध्ये नैसर्गिक संयुगे असतात, ज्यात सौम्य रेचक गुणधर्म आहेत.यामुळे पचनक्रियेला आणखी मदत होते.

पोटॅशिअमच्या चांगल्या प्रमाणामुळे हृदयाचे आरोग्य सुधारू शकते.यातील पोटॅशिअम शरीरातील सोडियमच्या परिणामांना प्रतिकार करून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करता येतो.

फळातील ट्रिप्टोफॅन आणि सेरोटोनिन प्रिकर्सर्स ही संयुगे मज्जासंस्थेवर प्रभाव पाडू शकतात. या फळाचे सेवन केल्याने ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होऊ शकते.

फळाचा आहारात वापर करताना...

लक्ष्मणफळाचे आरोग्यवर्धक फायदे आहेत परंतु ते सेवन करण्याआधी काही गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हे फळ पोषणमुल्यांचा साठा आहे तरी पण जास्तीचे सेवन धोकादायक ठरू शकते. यामध्ये खूप प्रमाणात तंतुमय पदार्थ आहेत, ज्यांचे अतिसेवन झाले तर पोटदुखी होऊ शकते.

गरोदर, स्तनपान करणाऱ्या मातांनी वैद्यांच्या सल्ल्यानुसार फळाचा आहारात समावेश करावा.

फळ संभाव्य आरोग्य फायदे देत असले तरी, कोणत्याही वैद्यकीय स्थितीसाठी, आजारासाठी ते एकमेव उपचार म्हणून वापरले जाऊ नये. तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आहारातील घटकांबद्दल वैयक्तिक प्रतिसाद वेगवेगळे असू शकतात, म्हणून एकूण आरोग्यासाठी संतुलित आणि वैविध्यपूर्ण आहार समाविष्ट करणे आवश्यक आहे.

कच्च्या लक्ष्मणफळात अनोनासीन संयुग असते. हे जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास हानी पोहोचवते, त्यामुळे कच्ची लक्ष्मण फळे अजिबात खाऊ नयेत. बियांचे सेवन करू नये.

आपण कोणत्याही आजारासाठी काही वैद्यकीय उपचार घेत असलो तरी डॉक्टर वनस्पतीजन्य/हर्बल घटक घेण्यासाठी मनाई करतात, कारण हर्बल घटक हे वैद्यकीय औषधांसोबत प्रक्रिया घडून आणतात, ज्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतात.लक्ष्मण फळाचे सेवन करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्यावा.

- डॉ. गणेश खळेकर, ९९६०५८९३४९

(राज्यस्तरीय जनुक पेढी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scam: विमा कंपन्यांकडून अधिकाऱ्यांना घोटाळ्यासाठी कमिशन; एसआयटी चौकशीची आमदार धसांनी केली मागणी

Mula Dam Water: ‘मुळा’तून पाथर्डी, शेवगावला पाणी द्या

Sarpanch Dispute: नांदागोमुख सरपंचांच्या अपात्रतेला तूर्त स्थगिती

Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

Cotton Rate: सीसीआयने विकला आतापर्यंत ६५ लाख गाठी कापूस

SCROLL FOR NEXT