Brick Making : भुसावळ तालुक्यात अवैध वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Illegal Brick Kilns : भुसावळ तालुक्यात सुमारे तीन ते चार हजार वीटभट्ट्या असून, त्यातील बहुतांश वीटभट्ट्यांना तहसील कार्यालयाची परवानगी नाही. पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही.
Brick Making
Brick Making Agrowon
Published on
Updated on

सकाळ वृत्तसेवा

Bhusawal News : भुसावळ : तालुक्यात सुमारे तीन ते चार हजार वीटभट्ट्या असून, त्यातील बहुतांश वीटभट्ट्यांना तहसील कार्यालयाची परवानगी नाही. पर्यावरण, प्रदूषण नियंत्रण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले नाही. यामुळे शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा व पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

तालुक्यात कंडारी, वरणगाव, सुसरी, कुऱ्हा, साकेगाव, बोहार्डी, टहाकळी, सुनसगाव, फुलगाव, जाडगाव रोड, तळवेल शिवार विल्हाळे या विविध ठिकाणी किमान तीन ते चार हजारापेक्षा अधिक वीटभट्ट्या सुरू आहेत. मात्र, यातील बोटावर मोजण्याइतक्यात वीटभट्ट्यांनी भुसावळ तहसील कार्यालयाकडून परवानगी घेतली आहे. यामुळे अवैध वीटभट्ट्यांमुळे आरोग्यासह अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

Brick Making
Lipstick Side Effect : सौंदर्यासाठी लिपस्टीक लावताय ओठांचं आरोग्य येईल धोक्यात

शहरासह परिसरात वीट पांरपारिक पद्धतीने बनविली जाते, मातीचे साचे बनवून ते एकमेकांवर रचून भट्टी बनवली जाते. दगडी कोळशाचा यामध्ये इंधन म्हणून वापर करण्यात येतो.

मात्र दगडी कोळसा जाळल्यानंतर त्यातून सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड आणि नायट्रोजनमधील ऑक्साईड या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. या विषारी वायूमधील सल्फर डायऑक्साईडमुळे डोळ्यांचे विविध विकार आणि हवेतील नायट्रोजनमधील डायऑक्साईडमुळे फुफ्फुसाचे व त्वचेचे आजार होतात, तसेच कार्बन मोनोऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड या विषारी वायुमुळे वीटभट्ट्या असलेल्या परिसरातील तापमानात वाढ होऊन सभोवतालच्या शेतीवर तसेच नागरिकांच्या आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होतो.

या सर्व कारणामुळे प्रदूषण नियंत्रक मंडळाने वीटभट्टी सुरू करण्यासंदर्भातील नियम सक्तीचे केलेले असताना देखील या सर्व नियम व अटींचे उल्लंघन करून बिनबोभाट सुरू आहेत. मात्र यामुळे भुसावळ आणि परिसरातील शेतीवर, नागरिकांच्या आरोग्यावर व पर्यावरणावर मोठा विपरित परिणाम होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com