Sushil Telange  Agrowon
ॲग्रो विशेष

Success Story : सुधागडचा सुपुत्र बनला ‘युनो’चा शांतता सैनिक

United Nation : आफ्रिकेतील सुदान प्रांतात युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाचे शांतता सैनिक म्हणून सुधागड तालुक्यातील रासळ या गावचे सुशील कृष्णा तेलंगे यांची निवड झाली आहे.

Team Agrowon

Pali News : आफ्रिकेतील सुदान प्रांतात युनो म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघाचे शांतता सैनिक म्हणून सुधागड तालुक्यातील रासळ या गावचे सुशील कृष्णा तेलंगे यांची निवड झाली आहे. यामुळे रायगड जिल्ह्याचे नावलौकिक झाले आहे. सुशील यांनी २०१७ मध्ये पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले आहे. हलाखीच्या परिस्थितीत त्‍यांनी हे यश प्राप्त केले आहे.

सुधागड तालुक्यातील रासळ, रामनगरमधील कृष्णा तेलंगे आणि सुलभा तेलंगे यांचे सुपुत्र सुशील यांना बारावीनंतर २०१३ मध्ये विज्ञान शाखेत शिकत असताना सैन्य दलाची ओढ लागली.

आई-वडिलांसोबत चार बहिणींच्या पाठी एकटा भाऊ, त्यात घरची परिस्थिती हलाखीची होती. तरीही सुशील आपल्या ध्येयाशी ठाम राहून घरच्यांच्या पाठिंब्याने जिद्द करून भारतीय सैन्य दलात भरती झाला.

सुशिल प्रशिक्षण घेत असताना खर्चाच्या बाबतीत वडिलांच्या आणि बहिणींच्या मदतीने पुढे जात राहिला. प्रशिक्षणानंतर (ईएमई) सुशील यांची इलेक्ट्रिक मॅकेनिकल इंजिनीअर म्हणून निवड झाली.

नोकरीत कार्यरत असतानाच पदवीचे शिक्षण पूर्ण केले. भारतीय सैन्य दलात त्यांना दहा वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर वयाच्या २९ व्या वर्षी आफ्रिका सुदान देशात संयुक्त राष्ट्र संघामध्ये भारतीय सैन्य दलातून शांतता सैनिक म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

सुधागड रहिवासी सेवा संघाचे प्रयत्न

सुशीलसारखे सुधागड तालुक्यातील अनेक तरुण सैन्य भरतीकडे वळत आहेत. ठाण्यातील सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ मुलांना सातारा येथे मिलिटरी प्रशिक्षणासाठी पाठवत आहे.

यामध्ये काही मुले सैन्यात दाखलही झाली आहेत. सुधागड तालुका रहिवासी सेवा संघातर्फे विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी-धंद्याकडे न वळता सैन्यात भरती होण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल घाडगे गावागावांत जाऊन, शाळांमधील शिबिर, कार्यक्रमांतून करत आहेत.

सैन्य दलाची सेवा पूर्ण झाल्यावर एखादा कारखाना उभा करणार आहे. त्या माध्यमातून काही तरुणांना रोजगार देऊन त्यांच्या कुटुंबाना स्थैर्य देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- सुशील तेलंगे, युनोचा शांतता सैनिक, सुधागड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT