Sugar Factory FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : सोमेश्‍वर कारखान्याचा ४३० रुपयांचा अंतिम हप्ता

Someshwar Sugar Factory : सोमेश्‍वर कारखान्याने सन २०२२-२३ या हंगामात गळीत झालेल्या ऊस बिलापोटी ४३० रुपये प्रतिटनाप्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

Team Agrowon

Pune News : सोमेश्‍वर कारखान्याने सन २०२२-२३ या हंगामात गळीत झालेल्या ऊस बिलापोटी ४३० रुपये प्रतिटनाप्रमाणे अंतिम हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे. महत्त्वाचे म्हणजे कारखान्याने सभासद, गेटकेनधारक, शेअर मागणीदार, बिगरनोंदीचे सभासद या सर्वांना समान दर दिला आहे.

दरम्यान, साखर कामगारांना एकूण २१ टक्के बोनस जाहीर केला आहे. त्यापैकी सोळा टक्के आगाऊ बोनसपोटी ३ कोटी ५९ लाख रुपयेदेखील कामगारांच्या खात्यावर वर्ग केले आहेत. सोमेश्‍वर कारखान्याने सन २०२२-२३ या हंगामात ११.९२ टक्के साखर उतारा राखत १२ लाख ५६ हजार टन उसाचे गाळप केले होते. नुकताच कारखान्याने ३३५० रुपये प्रतिटन इतका उच्चांकी दर जाहीर केला होता.

तत्पूर्वी सभासदांना एफआरपी प्रतिटन २८५० रुपये व अधिकचे ५० रुपये प्रतिटन, अशी एकूण २९०० रुपये शेतकऱ्यांना अदा केले होते. त्यामुळे ४५० रुपये शेतकऱ्यांचे येणे होते. त्यापैकी २० रुपये प्रतिटन रक्कम शिक्षण निधी म्हणून वार्षिक सभेच्या निर्णयानुसार कपात केली आहे. उर्वरित ४३० रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे सोमेश्‍वर कारखान्याने आतापर्यंत एफआरपीपेक्षा तब्बल पाचशे रुपये अधिकचे देऊन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्त्वाचे म्हणजे सभासद, बिगरसभासद, शेअर मागणीदार व गेटकेन अशा सर्व प्रकारच्या ऊस घालणाऱ्यांना समान दर दिला आहे आणि चालू हंगामातही सर्व शेतकऱ्यांना उसाचा दर समानच दिला जाणार आहे, अशी माहिती सोमेश्‍वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप व कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी दिली.

कामगारांना २१ टक्के बोनस

साखर कामगारांना एकूण २१ टक्के बोनस देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यापैकी १६ टक्के बोनस अॅडव्हान्स म्हणून दिवाळीला, तर उर्वरित पाच टक्के संक्रांतीला दिला जाणार आहे.

अॅडव्हान्स म्हणून कारखान्याच्या ४२७ कायम व २०६ हंगामी कामगारांना मिळून ३ कोटी २३ लाख रुपये बोनस बँक खात्यावर अदा केला आहे. याशिवाय जे कंत्राटी व रोजंदारी मजूर आहेत, अशा एकूण ४२३ जणांनाही प्रत्येकी साडेआठ हजार रुपये बक्षीस रक्कम देऊन त्यांचीही दिवाळी गोड केली आहे, अशी माहिती मुख्य लेखापाल उदय नांदखिले यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT