Sugarcane FRP : ‘भीमा’ पहिली उचल २४०० रुपये देणार

Sugarcane Season 2023 : चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल म्हणून प्रती टन २ हजार ४०० रुपयांप्रमाणे देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार धनंजय महाडिक यांनी केली.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon
Published on
Updated on

Solapur News : चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या उसाची पहिली उचल म्हणून प्रती टन २ हजार ४०० रुपयांप्रमाणे देण्यात येणार असल्याची घोषणा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक खासदार धनंजय महाडिक यांनी केली.

टाकळी सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या ४४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा व मोळी पूजन खासदार धनंजय महाडिक व कारखान्याचे पाच ज्येष्ठ सभासद सिद्धेश्वर पवार, सुखदेव चवरे, बजरंग चव्हाण, तानाजी हांडे व औदुंबर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी खासदार महाडिक बोलत होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Sugarcane FRP
Sugarcane FRP : उसाला दुसरा हफ्ता ४०० द्या, भाजपची साखर आयुक्तांकडे मागणी

खासदार महाडिक म्हणाले, की कालवा नियोजन समितीच्या बैठकीत उजनीच्या पाण्याचे पहिले आवर्तन डिसेंबर व दुसरे मार्चमध्ये सोडावे, अशी विनंती आपण करणार आहोत, असेही ते म्हणाले. कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक म्हणाले, की दररोज जास्तीत जास्त साडेपाच हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येणार आहे.

Sugarcane FRP
Raju Shetti News : उसाला प्रतिटन पहिली उचल एकरकमी ३३०० रुपये द्या : शेट्टी

कामगारांची दिवाळी गोड व्हावी म्हणून ८.३३ टक्के बोनस व १५ किलो साखर मोफत देण्याची घोषणा यावेळी केली. तर सिव्हिल विभागातील कामगारांना शंभर रुपये रोज वाढ करण्याचीही घोषणा अध्यक्ष महाडिक यांनी केली.

यावेळी कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे, सुनील चव्हाण, अंकुश अवताडे, वीरसेन देशमुख, दीपक पुजारी, विशाल पवार, विकास पाटील, माणिक बाबर, महादेव देठे, छगन पवार, पांडुरंग ताटे, भीमराव वसेकर उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com