Clean Water Technology : त्रिपुरामधील राज्यसरकारच्या अखत्यारितील त्रिपुरा अक्षय ऊर्जा विकास संस्थेला (टीआरईडीए) ५० दुर्गम ठिकाणी असलेल्या आदिवासी वस्त्यांवर सौरऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याची माहिती बुधवारी राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली.
ज्या भागांतील नागरिकांना वीजपुरवठा होऊ शकत नाही अशा १४ दुर्गम वस्त्यांमध्ये त्रिपुरा सरकारच्या वतीने नुकतेच जलशुद्धीकरण प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू करण्यात आले. त्यापार्श्वभूमीवर आत राज्य सरकारने ‘टीआरईडीए’ अशाच स्वरूपाच्या आणखी ५० ठिकाणी सौरऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्पांची उभारणी करण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘डोंगराळ भागात लोकसंख्या विरळ असते अशातच काही
वस्त्यांमधील नागरिकांना वीज बिल देणे शक्य होऊ शकत नाही, अशा ठिकाणी हे सौरऊर्जेवर आधारित प्रकल्प अतिशय उपयुक्त ठरत आहेत. आतापर्यंत सुमारे १४ वस्त्यांवर अशा प्रकारे सौरऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत,’’ अशी माहिती ‘टीआरईडीए’चे सहसंचालक देबब्रत सुलकदास यांनी पीटीआयशी बोलताना दिली.
या १४ प्रकल्पांसाठी सुमारे २.२४ कोटी रुपये खर्च आला असून दुसऱ्या टप्प्यातील या प्रकल्पांसाठी ८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही सुलकदास यांनी सांगितले. अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी हा जलशुद्धीकरण प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. विविध
भौगोलिक कारणांमुळे ‘जल जीवन मिशन’च्या माध्यमातून ज्या भागात पिण्याचे पाणी पोहोचू शकत नाही त्या भागात हा सौरऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे.
असा प्रकल्प
सौर ऊर्जेवर आधारित या जलशुद्धीकरण प्रकल्पात आसपासच्या जलस्रोतांमधून पाणी गोळा करण्यात येते त्याचप्रमाणे जमिनीखालील पाणी पंपाच्या साहाय्याने उपसून त्याच्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करून ते नागरिकांना वापरासाठी उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी जी यंत्रणा वापरण्यात आली आहे ती यंत्रणा सौरऊर्जेवर चालणारी आहे.
असा लाभ
दुर्गम भागातील नागरिकांना या जलशुद्धीकरण यंत्रणेमुळे शुद्ध पाणी मिळणार.
या शुद्ध पाण्यासाठी नागरिकांना कोणतेही शुल्क देण्याची गरज नाही.
अशुद्ध पाणी प्यायल्याने होणाऱ्या रोगांपासून सुटका होणार.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.