Solar Energy : सौर ऊर्जेतून शेतकरी हरितक्रांती घडवतील

CM Devendra Fadnavis : राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून, भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यभरात सौर ऊर्जेचा वापर करणारे सौर ग्राम तयार करण्यात येत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होणार असून, भविष्यात या हरित उर्जेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प २.० अंतर्गत वाशीम जिल्ह्यातील उंबरठा आणि धाराशिव जिल्ह्यातील नारंगवाडी येथील प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.

CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis : सध्या शेतकऱ्यांना मोफत वीज; पुढच्या पाच वर्षात मागेल त्याला सौर कृषी पंप : फडणवीस यांचा दावा

राज्यातील शेतकऱ्यांना सध्या मोफत वीज पुरविण्यात येते, मात्र या पोटी राज्य सरकारवर मोठा आर्थिक भार पडतो. त्यामुळे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राज्यात राबविण्यात येत आहे या अंतर्गत वाशीम आणि धाराशिवमधील दोन प्रकल्पांचे लोकार्पण मंगळवारी करण्यात आले.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल. राज्यातील शेतकऱ्यांना १६ हजार मेगावॉट इतकी वीज देतो. हे सर्व फीडर सौर ऊर्जेवर आणण्याचे काम दोन वर्षांपासून सुरू केले आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व फिडर सौर उर्जेवर आणण्यात येतील.

CM Devendra Fadnavis
Solar Energy : निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती

या कार्यक्रमाला उंबरठा आणि नारंगवाडी गावातील शेतकरी दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. या वेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव आश्‍विनी भिडे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

शेतकऱ्यांना दिवसा विजेसाठी मदत

शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होऊ शकेल. सौर ऊर्जेमुळे राज्यात शेतकऱ्यांना मोफत विजेपोटी देण्यात येणारा आर्थिक भार ही कमी होणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा आणि सतत वीज मिळण्याची मदत होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com