Solar Project agrowon
ॲग्रो विशेष

Solar Project : सौरऊर्जेसाठी ‘सह्याद्री फार्म्स’चे पाऊल पडते पुढे

Nashik news : सह्याद्री फार्म्स आणि सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यात नाशिक भागात २० सोलर टनेल व ९० सौरपंप कार्यान्वित झाले आहेत.

Team Agrowon

Sahyadri Farms : शेतीसाठी भारनियमन व शेतीमालाचे अतिरिक्त उत्पादन झाल्यानंतर मूल्यवर्धन करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने वाळवण करताना अडचणी येतात. यावर मात करण्यासाठी सह्याद्री फार्म्स आणि सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्या संयुक्त विद्यमाने प्रायोगिक प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यामुळे नाशिक भागात २० सोलर टनेल व ९० सौरपंप कार्यान्वित झाले आहेत. त्यामुळे सौर ऊर्जेसाठी ‘सह्याद्री’चे पाऊल पुढे पडते आहे.

शेतीमाल उत्पादनात भावातील चढउतार व निसर्गाच्या असमतोलामुळे होणारे पिकांचे नुकसान याचा शेतकऱ्यांना नेहमीच फटका बसत आला आहे. ही परिस्थिती पाहता काढणीपश्‍चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. त्यासाठी सोलर ड्रायरसारखा पर्याय आवश्‍यक ठरतो. सह्याद्री फार्म्स आणि सस्टेन प्लस यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर ड्रायरचा प्रायोगिक प्रकल्प मागील वर्षी हाती घेण्यात आला. यामध्ये ५०० किलो क्षमतेचे २० सोलर टनेल ड्रायर उभारण्यात आले.

सस्टेन प्लस (टाटा ट्रस्टचा उपक्रम) यांच्याकडून प्रति ड्रायर ६५ टक्के अर्थसाह्य व उर्वरित ३५ टक्के आर्थिक भार शेतकऱ्यांनी उचलला. या माध्यमातून एकूण २० सोलर टनेल ड्रायर उभारण्यात आले. या माध्यमातून शेतकऱ्यांना २० लाखांचे आर्थिक साह्य मिळाले. या सर्व ड्रायरची उभारणी इंदोर येथील रहेजा सोलार या संस्थेमार्फत करण्यात आली. सोलर ड्रायर उभारणीनंतर शेतकऱ्यांना सह्याद्री फार्म्स व रहेजा सोलर यांच्यामार्फत उत्पादन प्रशिक्षण देण्यात आले. मागील वर्षभरात हे शेतकरी द्राक्ष पिकातून बेदाणानिर्मिती, टोमॅटोपासून सुकलेले काप तसेच मागील मार्चपासून कांद्यापासून सुकविलेल्या कांद्याची निर्मिती करीत आहेत. सोलर ड्रायरच्या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा वेगळा पर्याय निर्माण होऊ शकला. या माध्यमातून शेतकऱ्यांनी आतापर्यंत जवळपास ५ टन बेदाणा, २ टन टोमॅटो व १० टन कांदा या उत्पादनांची यशस्वीरित्या प्रक्रिया केली आहे.

सस्टेन प्लसच्या सहकार्याने सौर वाळवण व सौर पंप यांचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रकल्प राबविला. यातून अपारंपरिक उर्जेचा वापर शेतीसाठी करताना सोलर पंप व सोलर ड्रायर शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. यामध्ये मूल्यवर्धन करून काढणीपश्‍चात होणारे अपव्यय यावर नियंत्रण आणता आले. यातून शेतीमालाचे दर पडण्याच्या काळात पर्यायी व्यवस्था नक्कीच उभी राहू शकेल.
- विलास शिंदे, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स, मोहाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT