Agri Tourism Center : जागतिक पर्यटनदिनी सह्याद्री कृषी पर्यटन केंद्राचा सन्मान

Tourism Day : जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात वैरागड (जि. बुलडाणा) येथील सह्याद्री कृषी पर्यटन केंद्राच्या संचालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Agri Tourism Center
Agri Tourism CenterAgrowon

Agri Tourism Akola News : जागतिक कृषी पर्यटन दिनाचे औचित्य साधून नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात वैरागड (जि. बुलडाणा) येथील सह्याद्री कृषी पर्यटन केंद्राच्या संचालकांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विदर्भात कृषी पर्यटन संकल्पना रुजविण्यात दिलेल्या योगदानाचे कौतुक म्हणून हा सन्मान केला गेला. शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन ही संकल्पना अस्तित्वात आणून शेती सोबतच स्थानिक ग्रामीण संस्कृतीला व्यवसायात रूपांतरित केला आहे.

शेतकऱ्यांनी शेतामध्ये पिकवलेल्या मालाला शेतातच बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी कृषी पर्यटन हा समर्थ पर्याय म्हणून पुढे येत आहे. यात महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्था कृषी पर्यटन आणि पर्यटन चळवळीला महत्त्व प्रदान करून देण्यासाठी काम करीत आहेत.

Agri Tourism Center
Akola Veterinary College : अखेर सहा वर्षांनंतर पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

विदर्भात कृषी पर्यटन ही संकल्पना आता रुजत आहे. स्मार्ट वेल्फेअर फाउंडेशन आणि विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट (वेद) कौन्सिल या संस्थाच्या पुढाकाराने जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त उत्कृष्ट काम केलेल्या विदर्भातील पाच कृषी पर्यटनांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात बुलडाणा जिल्ह्यातील सह्याद्री कृषी पर्यटन केंद्राचा समावेश होता.

पुरस्कार वितरण सोहळ्याला महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाचे उपसंचालक श्री. सवाई, स्मार्ट वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज महाजन व सचिव संजय मेमन, जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र मनोहरे, सहाय्यक वन संरक्षक नीलेश गावंडे, प्रशांत विरखरे, सहायक अध्यापिका प्रचिती बगाडे व इतर मान्यवर उपस्थित होते. वैशाली ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले, तर संजय मेमन यांनी आभार मानले.

...यांचा झाला सन्मान

- सह्याद्री कृषी पर्यटन, वैरागड

- आनंद मळा कृषी पर्यटन

- ठाकूरवाडी कृषी पर्यटन

- अरण्यफार्म कृषी पर्यटन

- पळसबाग कृषी पर्यटन

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com