Vilas Shinde
Vilas ShindeAgrowon

Sahyadri Farms : सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे यांना डॉ. सी. डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार

Agriculture Award : नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानचा यंदाचा डॉ. सी. डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार नाशिकमधील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे.
Published on

Nagpur News : नागपूरच्या कृषी विकास प्रतिष्ठानचा यंदाचा डॉ. सी. डी. मायी कृषितज्ज्ञ पुरस्कार नाशिकमधील सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष विलास शिंदे यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

शनिवारी (ता. १५) सायंकाळी ६ वाजता नागपूरमधील वनामतीच्या वसंतराव नाईक सभागृहात केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. कृषी विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, माजी आमदार व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी यांनी ही माहिती दिली.

Vilas Shinde
Sahyadri Farms : ‘सह्याद्री’ खरेदी करणार पंढरपुरातील बेदाणा

ज्येष्ठ कृषी अभ्यासक व शेतकरी नेते विजय जावंधिया अध्यक्षस्थानी असतील. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख कार्यक्रमाचे मुख्य अतिथी असतील. डॉ. मायी हे कार्यक्रमावेळी सन्मानार्थीविषयी बोलतील. शिंदे हे राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कृषी अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीधर (एमटेक) आहेत.

Vilas Shinde
Sahyadri Farms : ‘सह्याद्री फार्म्स’कर्मचाऱ्यांना देणार ७० कोटींचे शेअर्स

गेल्या २८ वर्षांपासून ते कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत. संपूर्ण शेतकऱ्यांच्या मालकीची असलेली देशातील आघाडीची व सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचा लौकिक आहे. २०१० मध्ये शिंदे यांच्या पुढाकाराने ही कंपनी सुरू करण्यात आली.

१६० शेतकऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आता २० हजारांहून अधिक शेतकरी सभासद आणि सुमारे ३५ हजार एकर क्षेत्रावर पोहोचला आहे. २५२ हून अधिक गावांमध्ये सह्याद्री फार्म्सचे कार्यक्षेत्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com