Water Tanker  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Scarcity : सोलापूर जिल्ह्यात यंदा चार टँकरने पाणीपुरवठा

Solapur Water Crisis : मागच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात पावसाने ५४५ मिलिमीटरची सरासरी पातळी ओलांडली. शिवाय शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यात यंदा ४ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा सुरु आहे. आणखी १२ टँकरची मागणी आहे. पण गतवर्षीच्या तुलनेत तो कमी आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत २८ टँकर सुरु होते. मागच्यावर्षी झालेला चांगला पाऊस आणि जलजीवन मिशनच्या कामामुळे टंचाईच्या झळा कमी बसण्याची शक्यता आहे.

मागच्या पावसाळी हंगामात जिल्ह्यात पावसाने ५४५ मिलिमीटरची सरासरी पातळी ओलांडली. शिवाय शेवटच्या टप्प्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणासह जिल्ह्यातील विहिरी आणि बोअरची पाणी पातळी लक्षणीय वाढली.

त्यामुळेच आता टंचाईच्या झळा कमी बसत आहेत. गेल्यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच २८ टँकरद्वारे २६ गावे आणि २०४ वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. यंदा माळशिरस तालुक्यात ४ टँकर सुरु आहेत. तर मोहोळ तालुक्यातून १२ टँकरची मागणी करण्यात आली आहे.

पडताळणीनंतरच मिळणार टँकर

जिल्ह्यात जलजीवन मिशनमधून १ हजार ३२९ पैकी ७०८ कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे टँकरची मागणी दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. तरीही गावातून टँकरची मागणी झाल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंता यांच्याकडून टंचाई स्थितीची खात्री केली जाईल. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जाईल. त्यानंतर टँकरची मागणी प्रस्तावित केली जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Turmeric Market: हळदीचे वायदे बंद करण्याची व्यापाऱ्यांची मागणी

Maharashtra Rain: राज्यात २३० मंडलांत अतिवृष्टी

Vidarbha Crop Loss: विदर्भात दोन लाख हेक्टरवर पीक नुकसान

Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

Soyabean Crop Damage: सोयाबीनवर कीटकनाशक फवारलं, सोयाबीन जळालं; केंद्रीय कृषिमंत्र्याचे कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT