Water Scarcity : ‘गिरणा’ ३३ टक्क्यांवर; गावांमध्ये पाणीटंचाईचे संकेत

Water Crisis : गिरणा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पातून तीन सिंचनाची आणि चार पेयजलाची अशी सात आवर्तने देण्याचे निश्चित झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत सिंचन आणि पेयजल मिळून तीन आवर्तने देण्यात आली आहेत.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात गेल्या वर्षी सरासरीपेक्षा १२० पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील लहान-मोठे बहुतांश प्रकल्प पूर्ण क्षमतेने ओसंडून वाहिले. नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत नदी-नाल्यांमध्ये जलप्रवाह सुरू होता. परंतु आवर्तनातून पाण्याचा वारेमाप वापर आणि उष्ण वातावरणामुळे बाष्पीभवनाचा वेग मोठ्या प्रमाणामुळे वाढला.

यात गिरणाचा ३३, तर हतनूरचा उपयुक्त जलसाठा ६० टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील अन्य लहान-मोठ्या ९६ प्रकल्पांमधील उपयुक्त जलसाठा सरासरी ४६.८७ टक्के आहे. अजून साडेतीन ते चार महिने शिल्लक जलसाठा पुरविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे.

जिल्ह्यात मॉन्सून काळात सर्वच लहानमोठे प्रकल्प तुडुंब भरून बऱ्यापैकी प्रवाहित होते. जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, पाच ते सहा तालुक्यांसह १३० च्यावर ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका, नांदगाव पालिका, ग्रामीण पाणीपुरवठा योजना गिरणा प्रकल्पावर अवलंबून आहेत.

गिरणा कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत प्रकल्पातून तीन सिंचनाची आणि चार पेयजलाची अशी सात आवर्तने देण्याचे निश्चित झाले आहे. त्यापैकी आतापर्यंत सिंचन आणि पेयजल मिळून तीन आवर्तने देण्यात आली आहेत. सद्य:स्थितीत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गिरणा प्रकल्पात ३३.८१ टक्के उपयुक्त जलसाठा असून, आता फक्त पेयजलासाठी चार आवर्तने शिल्लक आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : पैनगंगा नदीकाठच्या ४४ गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट

मे महिनाअखेरीस बागायती कपाशी लागवडीसाठी पाणी सोडण्याची ओरड होईल. परंतु मे महिन्याअखेर उर्वरित साठ्यामधून सिंचन वा कपाशी लागवडीसाठी आवर्तन सोडल्यास पेयजलाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हतनूर प्रकल्पातूनदेखील आतापर्यंत तीन आवर्तने सोडण्यात आली असून, सद्य:स्थितीत ६०.५९ टक्के उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. गिरणा प्रकल्पाच्या मानाने हतनूर प्रकल्पात दुप्पट जलसाठा शिल्लक असून, पाडळसे आणि शेळगाव बंधाऱ्यातदेखील जलसाठा आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या पूर्व भागात सिंचन आणि पेयजल साठ्याची कमतरता भासणार नाही.

Water Scarcity
Satara Water Scarcity : साताऱ्यातील टंचाई निवारण्यासाठी १४.६१ कोटींचा आराखडा

धरणातून पाणीचोरी, अपव्यय?

गिरणा प्रकल्पात १०० टक्के उपयुक्त जलसाठ्यापैकी डिसेंबर ते जानेवारी दरम्यान पहिल्या आणि फेब्रुवारी ते मार्च महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील आवर्तन सोडण्यात आले. यात सरासरी ५० टक्के सिंचनासह पेयजलासाठी वापर झाला आहे. तर सरासरी १४ ते १७ टक्के बाष्पीभवन आणि बऱ्याचशा ठिकाणी कालवा पाटचारीतून थेट पंपाद्वारे पाणीचोरी वा पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर झाला असण्याची शक्यता आहे.

चाळीसगाव, अमळनेरमध्ये टंचाईसदृश गावे

एप्रिल महिन्याच्या अखेरीस किंवा मेच्या मध्यात जळगावातील अमळनेर, चाळीसगाव भागात टँकरची मागणी येऊ शकते. यानंतर टँकरची संख्या वाढेल, असे संकेत आहे. अमळनेरातील निसर्डी, लोणपंचम, शिरसाळे, तळवाडे, नगाव, आर्डी-अनोरे, लोण बुद्रूक, नगाव खुर्द, देवगाव देवळी, पिंपळे खुर्द व चिमनपुरी, डांगर बुद्रुक, भरवस, अंचलवाडी, आटाळे, सबगव्हाण, लोणचारम तांडा, पिंपळे बुद्रूक व गलवाडे बुद्रुक ही गावे टंचाईग्रस्त असतात.

धरण शिल्लक साठा

गिरणा ३३.८९ टक्के

हतनूर ६०.५९

वाघूर ५१.८१

भोकरबारी ५.९३

बोरी १८.६३

शेळगाव बॅरेज २२.९४

हिवरा २७.९०

अंजनी ३७.८७

मन्याड ४३.९८

तोंडापूर ४२.३७

बहुळा ४१.२९

मंगरूळ ५३.१९

गूळ ७०.५९

अभोरा ७६.३२

मोर ७२.८९

सुकी ८२.८५

सरासरी ३०.३७ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com