Water Scarcity : धामणी नदी कोरडी; सात गावांना पाणी टंचाईची झळ

Water Crisis : धामणी नदीत शेतकऱ्यांनी सुमारे अडीच लाख रुपये खर्चून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यांमधील पाणी आटल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : धामणी नदीत शेतकऱ्यांनी सुमारे अडीच लाख रुपये खर्चून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यांमधील पाणी आटल्याने नदीपात्र कोरडे पडले आहे. सध्या धामणी नदीत पाण्याचा खडखडाट झाला असून, खेरीवडेपासून जर्गी, कडवेपर्यंतच्या सात गावांना आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा भासू लागल्या आहे.

येथील शेतीच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला असून परिसराला वळवाच्या पावसाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. गगनबावडा, राधानगरी व पन्हाळा या तीन तालुक्यांतील सुमारे चाळीस गावांना धामणी नदीतून पाणीपुरवठा होतो. उन्हाळ्यात पिकांना जीवदान मिळावे यासाठी हिवाळ्यातच लोकवर्गणी व श्रमदानातून शेतकरी मातीचे बंधारे बांधून धामणी नदीत पाणी अडवितात.

Water Scarcity
Satara Water Scarcity : साताऱ्यातील टंचाई निवारण्यासाठी १४.६१ कोटींचा आराखडा

भागीदारीतून ठिकठिकाणी पाणीसाठा केला जातो. गेल्या महिनाभरापासून कडक उन्हाळ्याच्या झळा जाणवत आहेत. दर वर्षीपेक्षा या वेळी परिसरात ऊसतोडणी हंगाम लवकर संपला. त्यामुळे ऊस शेतीसाठी पाणीउपसा मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. पूर्वेकडील भागात कुंभी धरणातील महत्त्वाकांक्षी बॅकवॉटर योजनेमुळे नदी दुथडी भरून वाहत आहे.

Water Scarcity
Water Scarcity : गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक पाणीसाठा

पश्चिमेकडील म्हणजे नदी उगमाकडील परिसरात थोडेफार पाणी आहे. याउलट गेल्या दोन दिवसांपासून कडवे ते खेरीवडे दरम्यान मधल्या परिसरात धामणी नदीपात्रात खडखडाट झाला आहे. कृषिपंप उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे सात गावांतील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

आणखी दोन महिने तरी कडक उन्हाळ्याचे आहेत. त्यामुळे जून महिन्यापर्यंत पिके कशी जगवायची असा शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी वळवाच्या सरी कोसळल्या, मात्र, धामणी परिसरात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले आहेत.

शेती व पिण्याच्या पाण्यासाठी येथील शेतकरी धामणी नदीवर अवलंबून आहेत. नदीत मातीचा बंधारा बांधणे, नदीपात्रात खड्डे खोदणे, कूपनलिका मारणे यांसाठी शेतकऱ्यांचे लाखो रुपये खर्च होतात. दर वर्षी एकाच हंगामात हे प्रयोग केले जातात. सध्या नदीपात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच कोरडे पडले आहे. त्यामुळे स्वखर्चातून केलेले सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत.
- सरदार कांबळे, उपसरपंच, कोनोली तर्फ असंडोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com