Political Controversy: नाशिक येथे १२ ते १६ मार्चदरम्यान पार पडलेल्या ‘कृषिकुंभ२०२६’ या भव्य कृषी प्रदर्शनाकडे राज्याचे कृषिमंत्री, मंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवली. निमंत्रणे देऊनही एक मंत्री, खासदार व आमदार हजर राहिले. त्यामुळे एरवी व्यासपीठावरून शेतकऱ्यांबद्दल गळा काढणाऱ्या नेत्यांचा कळवळा केवळ भाषणांपुरताच मर्यादित असल्याचे उघड झाल्याने लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे..जिल्हा प्रशासन, कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता रुजावी यासाठी यावर तब्बल दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला..Krushi Kumbh Exhibition: ‘कृषी कुंभ’ प्रदर्शनाचे आयोजन नेटके,मात्र शासकीय यंत्रणांची उदासीनता.निमंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे पत्र कृषिमंत्र्यांसह विविध लोकप्रतिनिधींना देण्यात आले. मात्र खाजगी कार्यक्रमानिमित्त शहरात वळजळ असणाऱ्या मंत्री व लोकप्रतिनिधींना वेळ मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या प्रयत्नांना लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेचे ग्रहण लागले..Mini Saras Exhibition: मिनी सरस उत्पादने विक्री प्रदर्शन, खाद्य महोत्सव सुरू.कृषिमंत्री दत्ता भरणे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन स्वतः शेतकरी असलेले नेते मंत्री नरहरी झिरवाळ यांसारख्या यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे देखील आले नाहीत. मंत्री दादा भुसे, खासदार भास्कर भगरे आणि आमदार नितीन पवार, महापौर हिमगौरी आहेर, उपमहापौर विलास शिंदे यांचा अपवाद वगळता बहुतांश लोकप्रतिनिधी दांडी मारली.सध्या जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष आणि भाजीपाला उत्पादक शेतकरी नैसर्गिक आपत्ती व दरांतील घसरणीमुळे संकटात आहेत. अशा वेळी नेत्यांनी शेतकऱ्यांसाठी उपस्थित राहून त्यांना प्रोत्साहित करणे अपेक्षित होते. यंदा आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष साजरे होत आहे..मात्र महिला लोकप्रतिनिधी ही येथे फिरकल्या नाहीत. अनेकांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे खाजगी समारंभाला वेळ असतो. मात्र कृषी विभागाच्या कार्यक्रमाला नाही असेच चित्र या निमित्ताने समोर आले. कृषिमंत्री स्वतःच्या पक्षाच्या आमदारांच्या तालुकास्तरीय प्रदर्शनांना आवर्जून हजेरी लावतात, पण कृषी विभागाच्या राज्यातील या सर्वात मोठ्या जिल्हास्तरीय प्रदर्शनाकडे दुर्लक्ष केले. प्रदर्शनात ‘एआय’सह नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान नक्कीच दिसले, पण नेत्यांची सहानुभूतीही ‘कृत्रिम’ असल्याचे यातून सिद्ध झाले..शेतकऱ्यांचा सरकारवर घणाघातआमच्या नावाने केवळ योजना आणि घोषणा होतात. आम्ही फक्त मतांपुरतेच आहोत का? आम्ही वाऱ्यावरच का?" असा उद्विग्न सवाल शेतकरी विचारत आहेत. तर लोकप्रतिनिधींच्या या अनुपस्थितीमुळे समाज माध्यमांवर टीका होत आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.