Farmer Issues: माकणीसह परिसरात मंगळवारी सायंकाळी मेघ गर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. तर काही ठिकाणी गाराही पडल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली..परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उकाडा वाढला होता. आज सायंकाळी सुमारे पाच वाजता हलक्या पावसाला सुरवात झाली. त्यानंतर पावसाचा जोर वाढला. .Unseasonal Rain: धारूर, वडवणीत पावसाचा धुमाकूळ.परिसरात हरभरा व गव्हू पिकांच्या काढणी-मळणीचे काम सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीवर मोठा परिणाम झाला. राजेगाव (ता. लोहारा) परिसरातही काही वेळ मेघ गर्जनेसह गारांचा जोरदार पाऊस झाला. .Unseasonal Rain: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ.त्यामुळे आंब्याच्या झाडांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. माकणीचा आठवडे बाजार असल्याने सायंकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे ग्राहक, व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली..मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने काढणी केलेल्या गव्हाच्या पिकासह गहू अन् ज्वारीचे पीक आडवे झाले. त्यामुळे या पिकाचे नुकसान झाले आहे.- अविनाश देशमुख, शेतकरी, राजेगाव.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.