Agriculture Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Test : माती-पाणी परीक्षणामुळे शेतीतील अनावश्यक खर्च टाळता येतो

Water Test : शेतीतील पिकाच्या आरोग्यासाठी माती, पाणी, देठ तपासण्याचे महत्त्व जाणून घ्या. माणसाच्या आरोग्याप्रमाणेच पिकांच्या आरोग्यालाही महत्त्व आहे.

Team Agrowon

Solapur News : द्राक्ष उत्पादकांसह इतर शेतकऱ्यांनी पिकांच्या विविध घटकांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे, तसेच माती-पाणी परीक्षणासारख्या तपासण्यामुळे शेतीवरील अनावश्यक खर्च टाळता येतो, असे मत राज्याचे निविष्ठा व गुणनियंत्रण विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी शुक्रवारी (ता. १६) केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने बांधण्यात आलेल्या आधुनिक प्रयोगशाळेचे उद्‍घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार अध्यक्षस्थानी होते.

द्राक्ष संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे, उपविभागीय कृषी अधिकारी मनीषा मिसाळ, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी धनंजय पाटील, स्मार्ट प्रकल्पाचे संचालक मदन मुकणे, संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत देशमुख, सचिव गौसअहमद शेख या वेळी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, की शेतीतील पिकाच्या आरोग्यासाठी माती, पाणी, देठ तपासण्याचे महत्त्व जाणून घ्या. माणसाच्या आरोग्याप्रमाणेच पिकांच्या आरोग्यालाही महत्त्व आहे. पिकातील विशेषतः द्राक्षात पान, देठ, माती-पाणी आदींची तपासणी केल्याने आवश्यक खतांचा वापर करता येतो, उत्पादनखर्चही कमी होतो, असे ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Industry Target: पुणे जिल्ह्यातील कृषी उद्योगाचे १२ अब्ज डॉलरचे उद्दिष्ट

APMC Contribution Waiver: दुष्काळी बाजार समित्यांचे अंशदान माफ करा : सोमवंशी

US Import Ban: कॅनडाच्या उत्पादनांवर अमेरिकेची बंदी

Farmer Diwali Relief: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार : बावनकुळे

Maharashtra Sugar Industry: एक नोव्हेंबरनंतरच साखर कारखाने सुरू करा: इंडियन इरिगेशन फेडरेशनची मागणी

SCROLL FOR NEXT