Distribution of Soil Test Pamphlet : एकांबातील शेतकऱ्यांना माती परीक्षण पत्रिका

Collector Buvaneshwari S : गरोदर मातांची १२ आठवड्यांत नोंदणी करणे आणि माती परीक्षण पत्रिका वितरण करणे ही दोन उद्दिष्टे येत्या तीन महिन्यांत १०० टक्के साध्य करण्यात येईल
Collector Buvaneshwari S
Collector Buvaneshwari SAgrowon
Published on
Updated on

Washim News : ‘‘निती आयोगाच्या आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत वाशीम जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात शिक्षण, पोषण आहार आणि सामाजिक विकास या बाबतीत जिल्ह्याने १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.

तसेच उर्वरित गरोदर मातांची १२ आठवड्यांत नोंदणी करणे आणि माती परीक्षण पत्रिका वितरण करणे ही दोन उद्दिष्टे येत्या तीन महिन्यांत १०० टक्के साध्य करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बुवनेश्‍वरी एस. यांनी केले.

Collector Buvaneshwari S
Collector Kumar Ashirwad : ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात नीती आयोगामार्फत संपूर्णतः अभियानाच्या प्रारंभाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी निती आयोगाचे माहिती विश्‍लेषक (डेटा ॲनलायझर) हर्षद सिंग तसेच जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे आदी अधिकारी उपस्थित होते.

Collector Buvaneshwari S
Modern Agriculture Technology : भाजीपाला पिकातील आधुनिक तंत्रज्ञान

निती आयोगाने गुरुवारी (ता. ४) ५०० आकांक्षित तालुके आणि ११२ आकांक्षित जिल्ह्यातील १२ प्रमुख सामाजिक क्षेत्र निर्देशकांमध्ये संपूर्णतः प्राप्त करण्याच्या उद्देशाने संपूर्णतः अभियान नावाची देशव्यापी मोहीम सुरू केली आहे.

आरोग्य, पोषण, कृषी, सामाजिक विकास आणि शिक्षण या विषयांवर लक्ष केंद्रित करणारी ही व्यापक तीन महिन्यांची मोहीम या वर्षी सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी मालेगाव तालुक्यातील एकांबा येथील कृषी सहायकांना गावकऱ्यांसाठी १०० मृदा परीक्षण पत्रिका वितरित केल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com