Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rain in Telangana : तेलंगणा, आंध्र प्रदेशात पावसामुळे आतापर्यंत ३१ जणांचा मृत्यू

Rain Alert : तेलंगणा व आंध्र प्रदेशात पावसाने कहर केला असून पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांत तेलंगणामध्ये १६ तर आंध्र प्रदेशात १५ जणांचा मृत्यू झाला.

Team Agrowon

Hyderabad News : तेलंगणा व आंध्र प्रदेशात पावसाने कहर केला असून पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांत तेलंगणामध्ये १६ तर आंध्र प्रदेशात १५ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण बेपत्ता आहेत.

पुराला राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करण्याची मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. राज्य सरकार नुकसानीचा सविस्तर अहवाल केंद्राला सादर करेल, असेही त्यांनी सांगितले. नुकसानीचा अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल, असे राज्याचे मंत्री डी. श्रीधर बाबू यांनी सांगितले.

रेड्डी यांनी तेलंगणमधील पूरस्थितीची पाहणी करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली. जनावरांच्या नुकसानीबद्दलही अतिरिक्त भरपाई दिली जाईल. खम्मम, भद्रादी कोठागुडेम, मेहबुबाबाद आणि सूर्यापेट या पूरग्रस्त जिल्ह्यांनाही पाच कोटींची तत्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे.

हवामान खात्याने आणखी पावसाचा अंदाज वर्तविल्याने यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देशही रेड्डींनी दिले. गेल्या तीन दिवसांत धुवाधार पावसाने आंध्र प्रदेशात १५ जणांचा बळी घेतला.

गुजरातमध्ये एकजण बुडाला

गुजरातमध्ये पावसाचा जोर कमी झाला असला तरी नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. बोटाड जिल्ह्यात मंदिराकडे जाणारी नौका बुडून एक जण वाहून गेला तर तिघांना वाचवण्यात यश आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Krushi Anudan: नांदेडमध्ये कृषी यांत्रिकीकरणातून १२.७० कोटींचे अनुदान वितरित

Raju Shetti: बोगस आणि निकृष्ट खते, कीडनाशकांमुळे आंबा, काजू उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान, राजू शेट्टींकडून कारवाईची मागणी

Maharashtra Khat Satha: खरिपासाठी १.५० लाख टन युरिया, २५ हजार टन डीएपीचा संरक्षित साठा

Pani Tanchai Upay: पाणी टंचाईवर मात करत पेणच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग

Bhat Sheti in Maharashtra: सूर्या प्रकल्पामुळे उन्हाळी भातशेती बहरली

SCROLL FOR NEXT