Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; ७१ गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश

Hingoli Rain Update : हिंगोली जिल्ह्यात आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून बहुतांश भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत.
Hingoli Heavy Rain
Hingoli Heavy RainAgrowon
Published on
Updated on

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यात आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांनी पात्र ओलांडले आहे. यामुळे बहुतांश भागातील पिके पाण्याखाली गेली असून घरांसह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. हिंगोली शहरात देखील पाणी शिरल्याने जवळपास दोनशेंहून अधिक नागरिकांचे स्थालांतर प्रशासनाने केले आहे.

हिंगोलीत रविवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत असून अचानक आलेल्या पावसामुळे नाले आणि नद्यांना पूर आला. यामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरले असून नदी आणि नाल्या शेजारील शेती पाण्याखाली गेली आहे. त्यातच हवामानशास्त्र विभागाने पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने जिल्ह्यातील ७१ गावांना सतर्क राहण्यासह पुलावरून पाणी जात असताना पूल ओलांडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. तसेच गोयल यांनी सर्व प्रकारच्या आपत्तीशी सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरीकांनी प्रशासनास सहकार्य करावे असेही म्हटले आहे.

Hingoli Heavy Rain
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, पुरामुळे १२२ कोटींचे नुकसान

जिल्ह्यात रविवारी दमदार पाऊस झाला असून नदी नाल्यांना पूर आला आहे. येथील भोगाव, सावरखेडा, जडगावसह इतर ठिकाणी काही शेतकरी अडकून पडले होते त्यांना रेस्क्यू करण्यात आले आहे. तर खानापूर जवळील पुलाचा काही भाग वाहून गेला असून ईसापुर गावाच्या जवळ असलेल्या ओढ्याला देखील भेगा पडल्या आहेत. यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच पुढील दोन दिवसांच्या पावसाच्या अंदाजानुसार मोठा पाऊस होण्याची शक्यता असल्याने शेतात पाहणीसाठी देखील शेतकऱ्यांनी जाऊ नये असे देखील प्रशासनाने म्हटले आहे.

Hingoli Heavy Rain
Maharashtra Rain : नांदेड, परभणी, हिंगोली, यवतमाळ, बीड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूवात

जिल्ह्यात तीनही उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांसह पोलिस प्रशासन, जिल्हा परिषद प्रशासन, आरोग्य विभागासह नगरपालिका प्रशासनास अलर्ट राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून नागरीकांनी कुठल्याही अफवावांर विश्वास ठेवू नये. प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी गोयल यांनी केले आहे.

खासदार आष्टीकर यांच्याकडून आढावा

हिंगोली जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. यावेळी निर्माण झालेल्या पुर भागाची पाहणी हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली. तसेच त्यांनी याबाबत आढावा घेतला असून पूरग्रस्त नागरीकांना तातडीने स्वस्त धान्य दुकानातून तातडीने धान्य पुरवठा करावा अशी सूचना प्रशासनाला खासदार अष्टीकर यांनी दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com