Dada Lad Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Production : कापूस उत्पादन वाढीसाठी गळफांदी कापणे फायदेशीर

Dada Lad : कापूस पिकाला गळफांदी आणि फळफांदी अशा दोन प्रकारच्या फांद्या येतात. त्यांपैकी गळफांद्या फक्त अन्नरस शोषण करतात.

Team Agrowon

Jalna News : कापूस पिकाला गळफांदी आणि फळफांदी अशा दोन प्रकारच्या फांद्या येतात. त्यांपैकी गळफांद्या फक्त अन्नरस शोषण करतात. तर फळफांद्यांवर पाती लागून त्याचे रुपांतर बोंडामध्ये होते व पर्यायाने उत्पादनात वाढ होते, असे मत कापूस संशोधक शेतकरी दादा लाड यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे शुक्रवारी (ता. ५) कृषी विज्ञान केंद्राद्वारे आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या ३२३ व्या मासिक चर्चासत्रात प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. लाड बोलत होते. श्री लाड म्हणाले, की संकरित बी. टी. कपाशीची लागवड तीन बाय एक फूट अंतरावर करावी,

४५ दिवसांनी गळ फांद्या काढाव्यात आणि नव्वद दिवसांनी कपाशीचा शेंडा साधारणतः तीन फुटावर खुडावा आणि कपाशीच्या झाडाची वाढ मर्यादित ठेवावी. भरघोस उत्पादनासाठी सघन पद्धतीने लागवड करून एकरी झाडांची संख्या किमान १४ हजार ८०० इतकी ठेवावी.

म्हणजे एका झाडाला सरासरी २० बोंडे जरी लागली तरी शेतकऱ्यांना एकरी २० क्विंटल कापूस होऊ शकतो आणि हेच दादा लाड कापूस तंत्रज्ञान आहे, असेही ते शेवटी म्हणाले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषिरत्न विजयआण्णा बोराडे यांची उपस्थिती होती. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ.अनंत लाड (बडगुजर), बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT