Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Insurance : साडेसहा लाख अर्जदारांनी भरला खरिपात पीकविमा

Crop Insurance Update : खरीप पीकविमा योजनेत आजपर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ५१ हजार ७८९ अर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे.

Team Agrowon

Nanded News : खरीप पीकविमा योजनेत आजपर्यंत जिल्ह्यातील सहा लाख ५१ हजार ७८९ अर्जदार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. यात चार लाख १९ हजार ८६३ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया या प्रमाणे सहा लाख ५१ हजार ७८९ रुपये, तर केंद्र व राज्य सरकारकडून ३८२ कोटी रुपये विमा कंपनीकडे जमा होणार आहे. विमा भरण्यासाठी पाच दिवस शिल्लक असल्यामुळे सर्व पात्र शेतकऱ्‍यांनी विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगामात युनायटेड इंडिया जनरल इन्शुरन्स कंपनीद्वारे पंतप्रधान खरीप पीकविमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, उडीद व मूग या पिकांसाठी पीकविमा भरण्यात येत आहे. यात सहभागी होण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२४ आहे.

या योजनेत सर्व पात्र शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्यासह जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले. सहा लाख ५१ हजार ७८९ अर्जदार शेतकऱ्यांनी सहा पिकांसाठी विमा भरला आहे. यात शेतकऱ्यांनी चार लाख १९ हजार ८६३.७९ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी सहा लाख ५१ हजार ७८५ विमा हप्ता भरला. तर केंद्राचा १६५ कोटी व राज्य शासनाचा २१६ कोटी असा एकूण ३८२ कोटी ३४ लाखांचा विमा हप्ता कंपनीकडे जमा होईल. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आणखी पाच दिवस शिल्लक आहेत. शेतकऱ्यां‍नी सहभागी व्हावे, असे आवाहन बऱ्हाटे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT