Crop Insurance : मराठवाड्यात २ लाख ४३ हजार ६३० हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

Farm Insurance : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी शनिवार (ता. २२) अखेरपर्यंत केवळ २ लाख ४३ हजार ६३० हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrown
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी शनिवार (ता. २२) अखेरपर्यंत केवळ २ लाख ४३ हजार ६३० हेक्टर क्षेत्राचा विमा संरक्षित करण्याला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (ता. २०) १६ लाख २० हजार ५८५ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे.

पीकविमा संरक्षित केलेल्या मराठवाड्यातील ४ लाख २२ हजार ४३४ शेतकऱ्यांच्या २ लाख ४३ हजार ६३० हेक्टरमध्ये छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यातील २ लाख ५९ हजार ३४० शेतकऱ्यांच्या १ लाख २४ हजार ५८१ हेक्टर, तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांतील १ लाख ६३ हजार ४ शेतकऱ्यांच्या १ लाख १९ हजार ४९ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

Crop Insurance
Crop Insurance : चुकीच्या नोंदीचे कारण देत शेतकरी ठरवले अपात्र

पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत राज्यात खरीप हंगाम २०२४ साठी पीकविमा भरण्याची सुरुवात शासनाच्या पोर्टलद्वारे मंगळवारपासून (ता. १८) करण्यात आली आहे. जवळपास १४ पिकांसाठी १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना एक रुपयाप्रमाणे शासनाच्या पोर्टलवर पीकविमा भरता येणार आहे. भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ, कारळ, कापूस, कांदा आदी पिकांसाठी शेतकऱ्यांना पीकविमा उतरवता येईल.

पीक कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या पिकाची नोंद ई- पीकपाहणीमध्ये करणे आवश्यक आहे. शासकीय जमीन, अकृषिक जमीन, कंपनी, संस्था, मंदिर, मशीद यांची जमीन आदींवर पीकविमा काढता येणार नाही. पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी व्हायचे नसेल तर त्यांना विमा अर्ज भरण्याच्या अंतिम मुदती आधी किमान सात दिवस बँकेत विमा हप्ता न भरण्याबाबत कळविणे गरजेचे आहे.

Crop Insurance
Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्या

इतर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सातबारा उतारा, बँक पासबुक, आधार कार्ड व पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन बँकेत किंवा सेतू सेवा केंद्राच्या मदतीने पीकविमा योजनेत सहभाग घेता येईल. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास ४० रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे. संबंधित विमा कंपनी हे मानधन देते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपयाप्रमाणे रक्कम सीएससी चालकांना द्यावी, असेही आवाहन कृषी विभागाने सुरुवातीलाच केले आहे.

जिल्हानिहाय सरासरी व पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये) (ता. २० जूनपर्यंत)

जिल्हा सरासरी प्रत्यक्ष

छ.संभाजीनगर ६८४७१६ २९०३३०

जालना ६१९६९५ ३३४७२१

बीड ७८५७८६ ३५६८८६

लातूर ५९९४५६ २६४१९८

नांदेड ७६६८०९ २४२६९

धाराशिव ५०४७३६ १६९२१६

परभणी ५३४९०० १२१०६७

हिंगोली ३६१०५४ ५९८९८

जिल्हानिहाय विमा संरक्षित क्षेत्र (हेक्टरमध्ये) सहभागी शेतकरी (ता. २२ जूनपर्यंत)

जिल्हा शेतकरी क्षेत्र

छ.संभाजीनगर ९५८०५ ४३२१८.४७

जालना ६२०८२ ३५६१५.१८

बीड १०१४५३ ४५७४७.४

लातूर २५०२० १७५६८.०५

धाराशिव ६०४४९ ४८५५१.७३

नांदेड १७०२१ १२०६०.९२

परभणी ४१०६९ २७९३५.६९

हिंगोली १९४४५ १२९३३.४९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com