Crop Insurance : सांगलीतील अडीच लाख शेतकऱ्यांना ११७ कोटींचा पीकविमा परतावा मंजूर

Crop Insurance Refund : नुकसान भरपाईपोटी २ लाख ६० हजार ३७१ शेतकऱ्यांना ११७ कोटी ७ लाखांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती, पावसाचा खंड यामुळे खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पिकांचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी २ लाख ६० हजार ३७१ शेतकऱ्यांना ११७ कोटी ७ लाखांचा पीकविमा परतावा मंजूर झाला आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

जिल्ह्यातील बहुतांश शेती ओलीताखाली आली आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसतो. अतिवृष्टी, पावसाचा खंड यामुळे पिकांचे नुकना झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई मिळावी यासाठी राज्य शासनाने एक रुपया भरून पीकविमा योजना सुरू केली आहे. या पंतप्रधान पीकविमा योजनेत खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये ३ लाख ७७ हजार ८४४ शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत १५ जुलैपूर्वी सहभाग घ्या

जिल्ह्यात भात, सोयाबीन, मूग, भुईमूग, उडीद, मका या पिकांचे नुकसान झाले होते. त्यानुसार गतवर्षी पावसाचा खंड पडल्याने २५ टक्के अग्रिम पीकविमा देण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. तसेच नापेर क्षेत्र या घटकाअंतर्गत नुकसान भरपाई ही विमा संरक्षित रकमेच्या २५ टक्क्यांपर्यंत मर्यादेत देय आहे.

Crop Insurance
Crop Insurance : विमा प्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक आता ग्रामपंचायतीत लावणार

त्यानुसार अग्रिम आणि नापेर या दोन्ही घटकांनुसार ७८ हजार ६१५ शेतकऱ्यांना २१ कोटी ५७ लाख इतकी भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर एका महिन्यापूर्वीच वर्ग करण्यात आली आहे. यामध्ये आता नापेर घटकाअंतर्गत नुकसान क्षेत्राचे विमा संरक्षण संपुष्टात आले आहे. हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत अपेक्षित उत्पन्नावर आधारित २५ टक्के भरपाई यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे.

खरीप हंगाम २०२३-२४ पीकविमा योजनेची मंजूर भरपाई दृष्टिक्षेप

तालुका मंजूर रक्कम शेतकरी संख्या

आटपाडी १७,९६,९१,९८६ २९,२७४

जत ५९,६२,१६,५७६ १,१६,२७२

कडेगाव २,३२,५८,५३१ १०,९५०

कवठेमहांकाळ ७,३८,५८,४३२ १५,९२७

खानापूर-विटा १,०९,४०,१५२३ २६,१७४

मिरज १,९९,६३,४९१ १५,४४५

शिराळा २७,७१,०६० १४३६

तासगाव १३,८६,८२,३०७ ३६,२६७

वाळवा २,६८,८७,२७५ ८६२६

एकूण १,१७,०७,३१,१८१ २,६०,३७१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com