Sindhudurg Farmer World Record : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील चंद्रकांत काजरेकर यांच्या बागेतील हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाची जगातील सर्वांत मोठे पान म्हणून नोंद झाली आहे. ‘गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड’ व ‘वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’, अशा दोन जागतिक विक्रमांचा मान या पानाला मिळाला आहे.
यानिमित्ताने कुडाळ तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र राज्य आणि भारत देश या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले आहे. या पानाची लांबी ५५.६ सेंटीमीटर व रुंदी १५.६ सेंटीमीटर आहे.
काजरेकर हे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झाले. येथील आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर त्यांनी शेकडो सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तळवडे (ता.सावंतवाडी) येथील शेतात बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, दुर्मिळ वनौषधीची लागवड आदी यशस्वी प्रयोग केले आहेत.
दरम्यान, या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी काजरेकरांनी आपल्या मुली डॉ. नालंदा व डॉ. नुपूर आणि जावई श्री. धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डस, वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला. त्यानंतर पुर्नतपासणीचे रेकॉर्ड तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली.
वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र ठाकूर, प्राध्यापक उमेश कामत व प्राध्यापक दयानंद ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, छायाचित्रण, व्हिडिओ शूटिंग व रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपूर व जावई श्री. धीरज, डॉ. देवेन तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओची टीम यांचे सहकार्य लाभले.
लांबी, रुंदी मोजणी अन्...
आंबा व काजू बागायतीची आवड जोपासत असताना श्री. काजरेकर यांना हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या साहाय्याने जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जागतिक रेकॉर्ड होऊ शकते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.