Mango Crop Management : आंबा बागेतील पुनर्मोहरामुळे होणारी गळ कशी थांबवायची ?

Team Agrowon

पावसामुळे बागेत समस्या

गेल्या आठवड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला.  आधी थंडी आणि नंतरच्या पावसामुळे आंबा बागेत किड, रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.

Mango Crop Management | Agrowon

पुनर्मोहर

किमान तापमानात घट झाल्यामुळे काही बागांमध्ये पुन्हा मोहोर येऊ शकतो. 

Mango Crop Management | Agrowon

आंबा बागा पालवी ते फळधारणा अवस्थेत

सध्या आंबा बागा पालवी ते फळधारणा अवस्थेत आहेत. आंबा फळगळीच महत्वाच कारण म्हणजे पुनर्मोहर येणे.  

Mango Crop Management | Agrowon

तापमानात घट

किमान तापमानात घट झाल्यामुळे फळे धरलेल्या फांद्यावर पुन्हा नवीन मोहोर येण्याची शक्यता असते.

Mango Crop Management | Agrowon

फळांची गळ

अन्नद्रव्याचे वहन नवीन मोहोराकडे होऊन जुन्या मोहोराला असलेली वाटाणा किंवा गोटी आकाराची फळेही गळतात.

Mango Crop Management | Agrowon

प्रक्रिया टाळण गरजेच

मोहोर अवस्थेत असलेल्या आंबा झाडावर पुन्हा मोहोर येण्याची प्रक्रिया टाळण गरजेच आहे.

Mango Crop Management | Agrowon

उपाय

पुनर्मोहर येऊ नये म्हणून उपाय करताना जिबरेलिक ॲसिड ५० पी.पी.एम. म्हणजेच १ ग्रॅम प्रति २० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

Mango Crop Management | Agrowon
Agrowon