Kolhapur Bauxite Mining : कोल्हापुरात बेकायदेशीर बॉक्साईट उत्खनन, प्रशासनाची मात्र बघ्याची भूमिका

Illegal Bauxite Mining : तळगावच्या डोंगर कुशीत असलेल्या पाझर तलावाला लागून व चाफेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे.
Kolhapur Bauxite Mining
Kolhapur Bauxite Miningagrowon
Published on
Updated on

Kolhapur Illegal bauxite mining : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यातील दुर्गमानवाड, तळगाव परिसरातील डोंगरांमध्ये विनापरवाना बॉक्साईटची तस्करी राजरोस सुरू आहे. याबाबत 'दैनिक सकाळ'मधून बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर आठ दिवस उत्खनन बंद करण्यात आले होते.

परंतु आता तळगावच्या डोंगर कुशीत असलेल्या पाझर तलावाला लागून व चाफेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात बॉक्साईट उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. दरम्यान यावर अद्यापही कोणावर कारवाई करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या जात आहेत.

दुर्गमानवाड परिसरातील चाफेवाडी, घुमाळवाडी, बेरकळवाडी परिसरात असलेल्या पडीक जमिनीमधून जेसीबीद्वारे उत्खनन करून बॉक्साईट रातोरात लंपास करणारी एक टोळी कार्यरत आहे. या परिसरातीलच काही जण असून त्यांचे लागेबंधे गारगोटी, जयसिंगपूर परिसरात असल्याचे सांगण्यात येते. पावसाळा संपल्यानंतर शासकीय सुटीदिवशी उत्खनन करून रातोरात ट्रक भरून बॉक्साईडचे दगड व माती नेली जात आहे.

Kolhapur Bauxite Mining
Bauxite in Kolhapur : कोल्हापुरात विनापरवाना बॉक्साईटची राजरोस चोरी, ५०० ट्रक माल उचलला

चाफेवाडी खणीशेजारी गेल्यावर्षी ज्या शेतकऱ्याला याबाबतीत दंड केला होता, त्याच शेतात सध्या उत्खनन सुरू आहे. पाझर तलावाच्या भिंतीवरूनच गेलेल्या मागनि पुढे गेल्यास येथे तब्बल पाच ते सहा एकराचा परिसर खणलेला आहे. येथे रात्री उत्खनन केले जाते. हे ट्रक महसूल खात्याच्या तलाठी आणि मंडळ अधिकारी कार्यालयाच्या दारावरून जातात तरीही त्याचा लोकांना पत्ता नाही.

परवा यातूनच एका ट्रकला अपघात झाला होता. त्या ट्रकवर काय कारवाई झाली याची माहिती नाही. अपघातग्रस्त ट्रकसह उत्खननानाचा पंचनामा केला आहे. संबंधितांवर लवकरच कारवाई केली जाणार असल्याची माहिती राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com