Slit-Free Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Soil Fertility : जमिनीच्या सुपीकतेसाठी गाळ लाभदायक

Slit-Free Dam : गाळ काढल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा साठा वाढून सभोवतलाच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी लाभदायक ठरणार आहे.

Team Agrowon

Nanded News : गाळ काढल्यामुळे या प्रकल्पातील पाण्याचा साठा वाढून सभोवतलाच्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. गाळामुळे जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी लाभदायक ठरणार आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.

गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत गुरुवारी (ता. २७) भोकर येथे सुधा प्रकल्पातील गाळ काढण्याचा प्रारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते झाला. या वेळी भोकरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार विनोद गुंडमवार, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्यासह इतर विभागाचे विभाग प्रमुख, सेवा समर्पण परिवारातील सदस्य, मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते.

या कामासोबत नारवट येथील वन विभागाच्या तळ्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले. हा गाळ वन विभाग, सेवा समर्पण परिवार व नारवट येथील ग्रामस्थ यांच्या श्रमदानातून काढण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे.

त्या कामाचा गुरुवारी आरंभ करण्यात आला. या कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी भोकर उपविभागीय अधिकारी कार्यालय व भोकर तहसिल कार्यालयास भेट देवून १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत होत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage: एका दिवसात ८४६८ हेक्टरला फटका

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगरमध्ये पूर्वमोसमी पावसाचा पिकांना फटका

Food Processing License: अन्नप्रक्रिया परवाना नूतनीकरणाची अट रद्द

Revenue Department: शासकीय तिजोरीत ६१ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा

Lemon Price Drop: ऐन उन्हाळ्यात लिंबांच्या दरात घसरण

SCROLL FOR NEXT