
Nashik News : जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना प्रभावीपणे राबविली जात असून या योजनेच्या जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांसाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी बँकांसमवेतच औद्योगिक वसाहतीतील कंपन्या व जिल्हा उद्योग केंद्रांअंतर्गत येणाऱ्या आस्थापनांच्या सामाजिक दायित्व निधीची (सीएसआर) मदत घेण्यात येऊन निधी प्राप्तीसाठी संबंधित यंत्रणांनी पाठपुरावा करावा, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आढावा बैठकीत अपर जिल्हाधिकारी पारधे बोलत होते. या वेळी सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी रा. हि. झुरावत, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे, वरिष्ठ भू-वैद्यानिक किरण कांबळे, नंदकुमार साखला, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, बँक प्रतिनिधी, एमआयडीसीचे प्रतिनिधी, जिल्हा उद्योग केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
पारधे म्हणाले, की धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करून धरणांची पाणी साठवण क्षमता वाढविणे व काढलेल्या गाळाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची उत्पादकता वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
एका जलसाठ्यातील गाळ काढण्यासाठी एकापेक्षा अधिक अशासकीय संस्थांचे अर्ज असल्यास संस्थेची कार्यक्षमता तपासून समितीने संस्थेची निवड करावी. काम सुरू करण्यापूर्वी जलसाठ्याचे फोटो, व्हिडिओ काढून जिओ टॅगिंग करावे. तसेच गाळ वाहून नेणाऱ्या शेतकऱ्यांनी अवनी ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
२४ लाख घनमीटर गाळ काढला जाणार
२०२५-२६ साठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांतील धरणांमधून मृद व जलसंधारण विभागामार्फत एकूण ५७ कामे, जिल्हा परिषद लघू पाटबंधारे विभागाकडून १९१ कामे व मालेगाव पाटबंधारे विभागाकडून ४ कामे अशी एकूण २५२ कामे हाती घेण्यात येणार असून यातून एकत्रितपणे अंदाजित सुमारे २४ लाख ४० हजार ४४५ घनमीटर गाळ काढला जाणार असल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी झुरावत यांनी दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.