Soil Fertility : अशी घटत जाते जमिनीची सुपिकता ; उपाय काय करायचे?

Soil Health : दिवसेंदिवस पीक उत्पादनात घट होतेय. भारतात तर जगाच्या तुलनेत एकरी उत्पादकता खुपच कमी आहे. जमिनीची उत्पादकता कमी होण्यामागे विविध कारणे असली तरी त्यातील महत्वाच कारण म्हणजे जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता.
Soil Health
Soil Fertility Agrowon
Published on
Updated on

Soil Management : दिवसेंदिवस पीक उत्पादनात घट होतेय.  भारतात तर जगाच्या तुलनेत एकरी उत्पादकता खुपच कमी आहे. जमिनीची उत्पादकता कमी होण्यामागे विविध कारणे असली तरी त्यातील महत्वाच कारण म्हणजे जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता.

जमिनीची सुपीकता कमी होण्याची कारणे 

जमिनीचा सामू म्हणजेच जमिनीचा आम्ल विम्ल निर्देशांक सहापेक्षा कमी किंवा आठपेक्षा जास्त असण. जमिनीत सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी असण.  जमिनीत चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यांपेक्षा जास्त असण. याशिवाय जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळेही जमिनीची सुपिकता घटते.  

Soil Health
Soil Fertility : जमिनीची सुपीकता वाढविण्याचे उपाय

भरखताद्वारे म्हणजेच शेणखत, कंपोस्ट खत या खताद्वारे दिलेली अन्नद्रव्ये जमिनीत साठून राहिल्यामुळे आणि पाणथळ किंवा उथळ किंवा फार खोल जमिनी असल्यामुळेही जमिनीची सुपिकता कमी होते.  याशिवाय सतत एकच पीक घेत राहणे. पिकांची फेरपालट न करणे. भरखते अजिबात न वापरणे, खा­ऱ्या पाण्याचा सतत वापर केल्यामुळेही जमिनीची सुपिकता कमी होत जाते. 

जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी काय उपाय करायचे.  

जमिनीची पूर्वमशागत आणि आंतरमशागत योग्य प्रकारे करावी. हंगामानूसार पिकांची फेरपालट करावी. फेरपालटीत द्विदल पिकांचा समावेश करावा. भरखतांचा म्हणजेच शेणखत, कंपोस्टखत, गांडूळखत आणि लेंडीखताचा वापर हेक्टरी किमान पाच टन या प्रमाणात करावा. हिरवळीच्या खतांचा वापर केल्यामुळेही जमिनीची सुपिकता वाढते.

 प्रेसमड, कोंबडीखत आणि पाचटा पासून तयार झालेल्या खताचा वापर करावा.  याशिवाय जैविक किंवा जिवाणू खतांचा वापर,  रासायनिक खतांचा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समतोल वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. जमीन जर क्षारवट, चोपण असेल तर अशा जमिनी सुधारण्यासाठी भूसुधारकांचा वापर करावा. याशिवाय शेतात जल व मृदसंधारणाची कामे केल्याने जमिनीची धुप कमी होऊन जमिनीची पाणी धरुन ठेवण्याची क्षमता वाढते.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com