Sericulture  Agrowon
ॲग्रो विशेष

Reshim Ratna Award : रेशीम उत्पादकांचा होणार ‘रेशीम रत्न’ पुरस्काराने गौरव

Sericulture : एक एकरातून एक लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे रेशीम रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : एक एकरातून एक लाख रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे रेशीम रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. रेशीम संचलनालयाच्या पाठपुराव्यानंतर सहकार, पणन व वस्त्रोद्योग खात्याने गुरुवारी (ता.२२) या संबंधीचा शासन आदेश काढला. पुणे, छत्रपती संभाजी नगर, अमरावती, नागपूर या चार विभागांतील ६१२ शेतकऱ्यांना पहिल्यावर्षी हा पुरस्कार देण्यात येईल. त्यासाठी १५ लाख ९८ हजार रुपयांची तरतूद केली आहे.

राज्यात रेशीम शेतीतून अनेक शेतकऱ्यांनी एकरी एक लाख रुपयांचा परतावा मिळविला आहे. त्यामुळेच शासनाने राज्यात रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत एकरी एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना गौरविले जाणार आहे. पहिल्या पुरस्कारासाठी ११ हजार रुपये, दुसऱ्यासाठी ७५०० व तिसऱ्यासाठी ५००० रुपये याप्रमाणे जिल्हानिहाय्य बक्षीस रक्‍कम निश्‍चित केली आहे.

याकरिता शेतकऱ्यांना जिल्हा रेशीम कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागेल. पुरस्कारार्थीच्या निवडीसाठी रेशीम संचालकांच्या अध्यक्षतेत कृषी संचालक (विस्तार), उपसचिव (रेशीम), संबंधित जिल्ह्याचे रेशीम विकास अधिकारी, उपसंचालक प्रादेशिक रेशीम संचालनालय यांची समिती स्थापन केली आहे.

पुणे विभागातील सात जिल्ह्यांतून १९५, छत्रपती संभाजी नगर विभागाच्या आठ जिल्ह्यांतून १४१, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातील २४८, नागपूरच्या सहा जिल्ह्यातील २६ शेतकरी पुरस्कारासाठी निवडण्यात येतील.

...असे आहेत निकष

- रेशीम कोश उत्पादक असावा

- रेशीम कार्यालयात नोंदणी करावी

- प्रती १०० अंडीपुंजास किमान ६० किलो कोश उत्पादन

- कोश विक्रीची पावती

- एक एकरावर तुती किंवा टसर लागवड

- निकषानुसार किटक संगोपनगृहाचे बांधकाम

...असा आहे रेशीम गोशवारा

नोंदणीकृत शेतकरी ः १७४७१

तुती लागवड ः १८५३० एकर

गाव संख्या ः २४०९

कोश उत्पादन ः ३७४७ टन

अंडीपुंज वितरण ः ५६.५५ लाख

चॉकी वितरण ः ४५ लाख (८० टक्‍के)

पुरस्कारामुळे रेशीम शेतीला चालना मिळेल. कोश उत्पादनाच्या क्षेत्रात स्पर्धा वाढेल. शेतकरी सध्या एकरी एक लाखापेक्षा अधिकचे उत्पन्न घेत आहेत.
- महेंद्र ढवळे, उपसंचालक, रेशीम संचालनालय, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Laxman Hake: ओबीसींच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीही लक्ष्मण हाके मुंबईकडे जाण्यावर ठाम

Chemical Fertilizer Efficiency: विविध उपायांद्वारे वाढवा रासायनिक खतांची कार्यक्षमता

National Common Mobility Card: एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य; महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय

Madgyal Sheep Breed: ओळख माडग्याळ मेंढीची...

Sericulture Farming: रेशीम शेतीतून अर्थकारणाला गती

SCROLL FOR NEXT