Peaceful Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Peaceful Protest: पशुपालक, शेतकऱ्यांचा सोलापुरात मोर्चा

Solapur Protest: पशुपालक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीच्यावतीने कुरेशी आणि खाटीक समाज व्यावसायिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (ता. ७) सोलापुरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Solapur News: पशुपालक, शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीच्यावतीने कुरेशी आणि खाटीक समाज व्यावसायिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (ता. ७) सोलापुरात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

या मोर्चामध्ये माकपचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, बबलू गायकवाड, एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दी, आरिफ  शेख,मतीन बागवान, युवराज पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे नेते सहभागी झाले होते.  डॉ. आंबेडकर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा निघाला. गोरक्षकांविषयी आक्षेप घेणारे विविध फलक घेत मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले.

गेल्या काही दिवसांपासून पशुधन आणि मांस विक्री करणाऱ्यांवर हल्ले होत आहेत. तसेच खोटे गुन्हे दाखल होत आहेत, असा आरोप यावेळी झालेल्या सभेत करण्यात आला. तसेच यासंबंधीच्या गुन्ह्यांची चौकशी व्हावी आणि संबंधित व्यावसायिकांना संरक्षण व न्याय मिळावा, अशी ही मागणी करण्यात आली. मोर्चानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. प्रशासनाने यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

मोर्चेकरांच्या मागण्या 

१) कायदा हातात घेणाऱ्या तथाकथित गोरक्षकांवर कडक कारवाई व्हावी.

२) पोलिसांनी कायद्याचा गैरवापर करून पशुपालक,गाडी चालक व कुरेशी समाजाविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करू नयेत.

३) सार्वजनिक स्लॉटर हाऊसची उभारणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रत्येक तालुका,शहर पातळीवर तातडीने करावी व सुलभ व्यवस्था पुरवावी.

४) गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा करून भाकड बैल/रेडा यांच्या कत्तलीस परवानगी देण्यात यावी.

५) गोरक्षण छावण्यांतील जनावरांची आकडेवारी जाहीर करून गैरव्यवहारांवर कारवाई व्हावी.

६) पशुपालक,शेतकरी व गरीब वर्गाच्या हितासाठी जनावरांची कायदेशीर खरेदी-विक्री व वाहतूक पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना द्याव्यात.

ग्रामीण भागातील अनेक शेतकरी, पशुपालक आमच्या सोबत आहेत. सरकारने या विषयावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. बीफ खाणाऱ्यांची संख्या किती आणि शाकाहारी किती, ती एकदा तपासा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या.
-नरसय्या आडम, माजी आमदार, 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Fruit Drop: डाळिंबातील फुलगळीची कारणे काय?

Farmers Issues: दोन लाखांच्या मर्यादेमुळे फळबागधारक कर्जमाफीपासून वंचित

PM POSHAN Shakti: कागदावर पौष्टिक मेनू; प्रत्यक्षात साधी खिचडी !

Agriculture Expo: के. के. वाघ कृषी महोत्सवात फलोत्पादनाचे ‘लाईव्ह प्लॉट्स’

Chia Cultivation: पूर्व विदर्भात ‘चिया’ लागवडीला चालना

SCROLL FOR NEXT