Rotary's Peace Award : यंदाचा ‘रोटरी शांतता पुरस्कार’ कोठडिया आणि देवकुळे यांना प्रदान

The Rotary Club's Rotary Peace Award : ‘सृष्टी’ संस्थेचे संस्थापक प्रशांत कोठडिया यांनी वनीकरण व ग्रामीण विकासात भरीब कार्य केले आहे. तर डॉ. अमित देवकुळे हे शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्य व्यवस्थापन, आत्मिक विकास आणि योगाभ्यासाचा देशभर प्रसार करत आहेत.
Rotary's Peace Award
Rotary's Peace Award Agrowon

Pune News : ‘सृष्टी’ संस्थेचे संस्थापक प्रशांत कोठडिया आणि आंतरराष्ट्रीय शांतता व मानवी हक्क संघटनेचे सदस्य डॉ. अमित देवकुळे यांना यंदाचा रोटरी क्लबचा ‘रोटरी शांतता पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार रोटरी क्लब (शिवाजीनगर) आणि रोटरी क्लब (विसडम), पुणे यांचा सुयुक्त विद्यमाने पुण्यात अध्यक्षा डॉ. स्मिता जोग आणि विसडमचे अध्यक्ष सारंग बालंखे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी त्यांना यांना मानपत्र आणि स्मृतिचिन्ह देखील देण्यात आले. हा पुरस्कार सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल देण्यात आला आहे.

या विशेष समारंभ प्रसंगी, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर (निर्वाचित) शीतल शाह, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप वाघ, सचिव डॉ. भारती डोळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Rotary's Peace Award
Padma Shri Award : यंदा बळीराजाचाही होणार सन्मान; देशातील ५ शेतकऱ्यांना मिळणार पद्मश्री पुरस्कार

पुण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोठडिया आणि आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कार्यकर्ते डॉ. अमित देवकुळे यांना यांना यंदाचा रोटरी क्लबचा रोटरी शांतता पुरस्कार देण्यात आला. कोठडिया हे ‘सृष्टी’ संस्थेचे संस्थापक असून त्यांनी ‘वनराई’ संस्थेचे संस्थापक सचिव म्हणून वनीकरण व ग्रामीण विकासासाठी काम पाहिले आहे. तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्थापनेमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Rotary's Peace Award
Research Award : डॉ. उज्ज्वल राऊत यांना उत्कृष्ट संशोधनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार

त्याचबरोबर कोठडिया यांनी, सुमारे दीडशे अमेरिकी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी ‘भारतीय समाज आणि विकास’ या आंतरराष्ट्रीय शिक्षणक्रमाचे संचालक म्हणून भरीब कार्य केले आहे. याबद्दल त्यांचा अमेरिकेतील प्रसिद्ध युनिवर्सिटी ऑफ पेनसिलवेनिया’नेत्यांनी विशेष गौरवही केला होता. ते सध्या राज्यातील अनेक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि सल्लागार पदी कार्यरत आहेत

डॉ. अमित देवकुळे हे आंतरराष्ट्रीय शांतता व मानवी हक्क संघटनेचे सदस्य असून कार्यरत आहेत. ते शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये जीवनकौशल्य व्यवस्थापन, आत्मिक विकास आणि योगाभ्यासाचा देशभर प्रसार करत आहेत. या समारंभा प्रसंगी पुरस्कारार्थी कोठडिया, देवकुळे, डॉ. वाघ, शाह जोग आणि बालंगे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com