Adam Master Retirement : माजी आमदार आडम मास्तरांची राजकारणातून निवृत्तीची घोषणा

Politics Announcement : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे.
Adam Master
Adam MasterAgrowon
Published on
Updated on

Solapur News : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, कामगारांचे प्रश्न घेऊन मरेपर्यंत रस्त्यावरची लढाई लढली जाईल. रस्त्यावरची लढाई लढतच मरण पत्करेन, असेही माजी आमदार नरसय्या आडम यांनी मंगळवारी (ता.२६) सोलापुरात पत्रकारांशी बोलताना सांगितले.

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत सोलापूर मध्य या मतदारसंघातून श्री. आडम यांनी निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. ते जवळपास चौथ्या क्रमांकावर गेले.

Adam Master
Maharashtra Politics : फडणवीस सारख्यांच्या हातात राज्याची सत्ता जाऊ देऊ नका

याबाबत माजी आमदार आडम म्हणाले, की निवडणुकीच्या राजकारणातून घेतलेला निवृत्तीचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत अमलात आणला जाईल. पण सोलापूरमधील कामगार, कष्टकऱ्यांची चळवळ यापुढच्या काळात चालू ठेवण्यासाठी नवे नेतृत्व उभे करण्यात येईल.

आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात वारसदार नेमण्याची पद्धत नाही, हा काही संपत्ती वाटून घेण्याचा प्रकार नाही. जो चळवळीत पुढे जाईल, त्या माणसाला पक्षाचे नेतृत्व मिळेल. माझे वय आता ऐंशीपर्यंत आलेले आहे.

Adam Master
Political Manifesto : कर्जमाफी, भावांतर योजना राबवू

आता कुठेतरी थांबले पाहिजे, या विचारातूनच मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कामगारांची चळवळ मरेपर्यंत चालूच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुस्लिम करून कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडण्यात आली, त्यामुळेच माझा पराभव झाला, हा माझा प्राथमिक निष्कर्ष आहे, असेही आडम यांनी म्हटले.

आता कुठेतरी थांबले पाहिजे, या विचारातूनच मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कामगारांची चळवळ मरेपर्यंत चालूच राहणार आहे. विधानसभा निवडणुकीत हिंदू-मुस्लिम करून कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात फूट पाडण्यात आली, त्यामुळेच माझा पराभव झाला, हा माझा प्राथमिक निष्कर्ष आहे, असेही आडम यांनी म्हटले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com