Nashik News: राज्य सरकारने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ फलोत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ‘कोरडी’ ठरण्याची शक्यता आहे. या योजनेत २ लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची तरतूद असली, तरी द्राक्षासह इतर फळबागधारकांचे पीककर्ज या मर्यादेपेक्षा कितीतरी जास्त असल्याने ते या योजनेतून बाद होण्याची चिन्हे आहेत..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. ६) ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या थकीत कर्जासाठी २ लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहनपर लाभाची घोषणा केली.मात्र, तांत्रिक निकषांमुळे बागायतदार शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे..Farmers Issues: जळगाव जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांची मदत का रोखली?.द्राक्ष उत्पादनाचा एकरी खर्च ३ लाख रुपयांपर्यंत पुढे गेला असून बँकांकडून मिळणारे पीककर्जही २ लाखांच्या वर असते. यापूर्वी नोटबंदी, कोरोना संकट त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच यंदा ६ मे पासून झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष पट्ट्यात उत्पादनात ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे..Pomegranate Farmer Issue: हस्त बहरातील डाळिंबाच्या ५० टक्के बागा संकटात.अशा आर्थिक कोंडीत अडकलेल्या शेतकऱ्यांची कर्जे थकली असली, तरी ती २ लाखांच्या मर्यादेबाहेर असल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. द्राक्ष बागायतदारांचा एकरी खर्च ३ लाखांपर्यंत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी तणावात असताना सरकारने मर्यादेचा विचार करून सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे आहे.- कैलास भोसले, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ.फळबाग उत्पादकांचे कर्ज बहुधा २ लाखांच्या वरच असते. या अटीमुळे बहुतांश शेतकरी योजनेतून वगळले जातील, त्यामुळे ही घोषणा फसवी वाटते.- प्रा. संदीप जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.