Dalimb Fulgalichi karane: डाळिंबाचे उत्पादन कमी होण्यामागे फुलगळ मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. यंदा हस्त बहारातील डाळिंबाच्या ५० टक्के बागा संकटात आल्या. त्यासाठीही फुलगळ हेच महत्त्वाचे कारण ठरले. त्यामुळे सध्या शेतकरी आंबिया बहारावर भर देत आहेत. परंतु त्यातही फुलगळीची शक्यता सांगण्यात येत आहे..तापमानातील वाढ, अन्नद्रव्यांचे असंतुलन, परागीभवनाचा अभाव आणि कीड रोगांचा प्रादुर्भाव यामुळे डाळिंब बागेची फुलगळ मोठ्या प्रमाणात होते. शेतकऱ्यांनी फुलगळीचे योग्य ते कारण ओळखून बागेचे व्यवस्थापन करावे. या लेखातील माहिती राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. संग्राम धुमाळ यांनी दिली आहे..Pomegranate Farmer Issue: हस्त बहरातील डाळिंबाच्या ५० टक्के बागा संकटात.हवामान बदलफेब्रुवारी-मार्च महिना हा हिवाळ्यातून उन्हाळा ऋतूमध्ये जाण्याचा असतो. या महिन्यांमध्ये तापमान वाढ होते. त्यामुळे डाळिंबाच्या झाडावर ताण येतो आणि फुलगळ होते. तसेच कधी कधी अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान यामुळेही डाळिंब पिकावर ताण त्याची फुलगळ होते. तसेच उन्हाळ्यात पाण्याचा ताण आल्यावर फ्लॉवर अबॉर्शन म्हणजेच फुलगळ होते..अन्नद्रव्यांचे असंतुलनडाळिंबाच्या बहरामध्ये शिफारशीत अन्नद्रव्य देणे फार आवश्यक असतात. परंतु शेतकऱ्यांनी जर अन्नद्रव्यांचे व्यवस्थित नियोजन केले नाही तर फुलगळ पहायला मिळते. बहरासाठी नत्र खत कमी द्यावे लागते, पाण्याचा ताण द्यावा लागतो. परंतु यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांकडे दूर्लक्ष होते. जसे बोरॉन, झिंक, कॅल्शियम या अन्नद्रव्यांची कमतरता असल्यावरही फुलगळ होते..Pomegranate Farming: डाळिंबाची गुणवत्ता, दर्जा राखण्यासाठी प्रयत्न.परागीभवनाचा अभावडाळिंब हे स्वपरागीभवन करणारे फळ आहे. कारण डाळिंबामध्ये तीन प्रकारची फुलं असतात. नर फुल, मादी फुल आणि या नरमादी असे दोन्ही प्रजननभाग असलेले भाग म्हणजे उभयलिंगी फुले हे तीन प्रकार आहेत. परंतु मधमाश्यांमुळे परागीभवन वाढते. परिणामी फळधारणा वाढते. परंतु मधमाश्यांचे प्रमाण कमी झाल्याने बरीच फुले फलित होत नाहीत त्यामुळे सुद्धा फुलगळ होते आणि फळधारणा कमी होते..कीडरोगांचा प्रादुर्भावहवामानातील बदलांमुळे डाळिंबावर करपा, बुरशीजन्य करप्याची शक्यता असते. तसेच रस शोषक किडी जसे तुडतुडे, फुलकिडे, मावा या किडींचा प्रादुर्भाव वाढतो. या किडींच्या प्रादुर्भावाचा परिणाम फुलांवर आणि नवीन फळधारणेवर होतो. त्यामुळे फुलगळ वाढते आणि उत्पादन घटते..मदतीसाठी आवाहनशेतकऱ्यांनी फुलगळीचे कारण ओळखून त्यावर योग्य ते उपाय करावे. तसेच शेतकऱ्यांनी डाळिंब फळबागेत अडचणी आल्यास थेट राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर येथील संचालक डॉ. राजीव मराठे यांनी केले आहे.डॉ. राजीव मराठे, ९८९०६०९६५७संचालक, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.